Ajit Pawar Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar Latest News : 'देवगिरी'त भेटीगाठींचा सिलसिला सुरु; भुजबळ, वळसे पाटील, तटकरेंनी घेतली अजित पवारांची भेट

Ajit Pawar News: माध्यमांची नजर चुकवून अजित पवार विधानभवनाच्या दिशेने निघाले? पण का?

Satish Kengar

Ajit Pawar Devgiri Bungalow : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये सामील होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आज अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत.

आज सकाळी देवगिरीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर अजित पवार विधानभवनाकडे रवाना झाला आहेत. दुसरीकडे सिल्व्हर ओकवर प्रतोद अनिल पाटलांनी घेतली अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पडद्या मागे सूरू असलेल्या हालचालींबाबत विधान सभेचे प्रतोद अनिल पाटील यांच्याकडून माहिती घेतली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)

अजित पवार भाजपमध्ये जातील अशी चर्चा असतानाच मंगळवारी त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर याला पूर्णविराम लागेल, असं बोललं जात होतं. मात्र आज पाहिलं तर ज्या प्रकारे गाठीभेटी होत आहेत, त्यानंतर पुन्हा एकदा या चर्चला उधाण आलं आहे. (Maharashtra Latest News)

आज देवगिरीवरती या नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. त्यानंतर अजित पवार हे माध्यमांची नजर चुकवून एका वेगळ्या गाडीतून विधानभवनाच्या दिशेने निघाले, अशा पद्धतीची माहिती माहीत आहे. यामुळे पुन्हा अजित पवार भाजपमध्ये जातील, अशी चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT