पुणे: राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत येऊन महिना उलटला पण तरीही अजुन मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही आज मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका केली. 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही, असा टोला पवार यांनी लगावला.
मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीतील सिग्नलशिवाय होईना. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सध्या मदत हवी आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवालीही अजित पवार यांनी केला. (Ajit Pawar Latest News)
मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही. महाराष्ट्रात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. अतिवृष्टी, पाऊस, शिक्षणाशी संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणी आहेत याची जबाबादारी कोण घेणार, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत, ते एखाद्या कार्यक्रमाला जात असताना दिलेल्या वेळेच्या अगोदरच पोहचतात. पवार हे वेळेला पक्के आहेत, त्यामुळे ते ज्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, त्यात इतर मंडळीही लवकर येत असतात. अतंत्य शिस्तप्रिय नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. अजित पवार त्यांच्या कामाचा धडाका पहाटे सहापासूनच सुरू करतात. पण आज पुण्यातील एका कार्यक्रमाला चक्क अजित पवार उशिरा आले.
आज पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) त्यांयांच्याहस्ते सोमवार पेठेतील राष्ट्रवादीच्या युवक कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार उशिरा पोहोचले. त्यामुळे अजित पवार यांना लगेच दिलगिरी व्यक्त केली. गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदा कुठल्यातरी कार्यक्रमाला उशिरा पोहचले असल्याचा चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होत्या. (Ajit Pawar Latest News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.