Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

IT पार्क राज्याच्या बाहेर चाललंय, आपलं वाटोळं झालंय; पहाटे अजित दादा हिंजवडी दौऱ्यावर, सरपंचांनाही सुनावलं

Deputy CM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील रस्ते, मेट्रो आणि वाहतूक समस्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना फटकारलं. सरपंच जांभुळकर यांनाही त्यांनी सुनावलं.

Bhagyashree Kamble

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळीच हिंजवडीतील विविध विकासकामांची आणि मेट्रो प्रकल्पांची पाहणी केली. विशेषतः मेट्रो लाईन ३, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या रस्ते समस्यांसंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. कामाची पाहणी करत असतनाच त्यांनी हिंजवडीतील सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावलं.

अजित पवार आज पहाटेच हिंजवडीत पाहणी दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. मेट्रो लाइन ३ यासह बाकी मेट्रोच्या कामाची पाहणी यावेळी त्यांनी केली. पाहणी दौरा दरम्यान, त्यांनी मेट्रो प्रशासन आणि PMRDA प्रशासनाला सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. आता सुधारणा झाल्या आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय.

पाहणी दौरादरम्यान, त्यांनी अधिकाऱ्यांची शाळा घेतली. 'आपलं असं ठरलंय. कामाच्यामध्ये कुणी आला तर, त्यावर ३५३ दाखल करा. मग तो कुणीही असो, अजित पवार देखील कामाच्या मध्ये आला तर, ३५३ दाखल करा. ३५३ लावायचं कारण, त्याशिवाय काम होणार नाही. आपल्याला लवकरात लवकर काम पूर्ण करायचं आहे', असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी सरपंचांना सुनावलं

कामाची पाहणी करत असतानाच हिंजवडीतील सरपंच गणेश जांभुळकर यांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले. 'असू द्या साहेब. धरण करताना मंदिरात जातात ना.., तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो. पण मला जे करायचं आहे तेच करतो. खरंतर आपलं वाटोळं झालंय. हिंजवडीतील आयटी पार्क पुणे, राज्याच्या बाहेर चाललं आहे. तुम्हाला काही पडलेली नाही. मी ६ वाजता कशासाठी पाहणी करण्यासाठी येतो. मला कळत नाही का, की माझी माणसं नाहीत..' असं म्हणत अजित पवारांनी त्यांना खडसावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT