ajit pawar News :  Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar :...म्हणून विरोधकांनी मराठी भाषेचा मुद्दा काढला; अजित पवारांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

ajit pawar News : अजित पवारांचा ठाकरे बंधूंवर घणाघात केला आहे. मुद्दे नसल्याने मराठीचा मुद्दा घेतलयाची टीका अजित पवारांनी विरोधकांवर केली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. मीरा-भाईंदरमध्येही मराठीच्या मुद्यावरून मनसे आणि शिवसेना पक्षाने सत्ताधाऱ्यांना जेरीस आणलं आहे. याच मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारवर होत असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिला नसल्याने कोणतातरी मुद्दा काढायचा. त्यामुळे मराठीचा मुद्दा काढला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठवाड्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्यानंतर अजित पवारांनी बोलताना मराठी भाषेवरून विरोधकांवर निशाणा साधला.

अजित पवार यांनी म्हटलं की, सभागृह चालू आहे. दोन बिलं काढायची होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार ठेवला होता. मराठी माणूस आज सर्वोच्च पदावर गेले आहेत. त्यांचे नगरपालिकेतील शाळेत मराठी शिक्षण झाले. अमरावतीहून नागपूर, मुंबई आणि आता दिल्लीला पोहोचले. विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. त्या दृष्टीने काम सुरु आहे'.

'नेदरलॅंड आणि महाराष्ट्र सरकार यांच्या मार्फत आयटीआयमध्ये सुधारणा करतोय. नवीन कोर्सेस केल्याने कोणते रोजगार मिळणार त्यादृष्टीने आपण तयारी करतोय. यासंदर्भात एमओयू झाला आणि म्हणून उशीर झाला. १० जून रोजी राष्ट्रवादीची स्थापना झाली. सर्वधर्मसमभाव या दृष्टीने आपला विचार आहे. कोणता समाज किती आहे, काही समाज गरीब आहे. इतरांच्या सोबत त्यांना पुढे आणायचं आहे. जातनिहाय जनगणनेला मान्यता दिली आहे, असे ते म्हणाले.

'विधानसभा आणि लोकसभा निवडणुका २०२९ मध्ये त्या दृष्टीने होणार आहे. काही मतदारसंघांची फेररचना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहा विधानसभा दृष्टीने १ लोकसभा येते. संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोकांनी लक्षात घ्यावं. ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होत असताना शहरी भाग वाढतोय. ग्रामीण सोबतच शहरी भागातील प्रश्न सोडवले पाहिजे. घरकुलांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ३० लाखांहून अधिक घरं मिळाली आहेत, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT