rupali thombare news  Saam tv
मुंबई/पुणे

निवडणुकीनंतर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रकृती अस्वस्थ; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल

rupali thombare news : पुणे महापालिका निवडणुकीनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Akshay Badve

रुपाली ठोंबरे यांची प्रकृती अस्वस्थ

रुपाली ठोंबरे यांना रुग्णालयात केले दाखल

ठोंबरे यांची सोशल मीडियावर खास पोस्ट

पुण्यातील अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. निवडणुकीत झालेल्या दगदग आणि धावपळीनंतर रुग्णालयात दाखल झाले असल्याची ठोंबरे यांनी माहिती दिली. 100 हत्तीचे बळ घेऊन तुमची बहीण ताकदीने उभी राहील, असा विश्वास देखील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला आहे.

रुपाली ठोंबरे पाटील या पुणे महापालिकेत दोन प्रभागातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. पुण्यातील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार या निवडणुकीसाठी पुण्यात महिनाभर ठाण मांडून बसले होते. तर भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपसाठी मोठी फिल्डिंग लावली होती.

या निवडणुकीत रुपाली पाटील यांनी दोन प्रभागातून निवडणूक लढली. मात्र, दोन्ही प्रभागातून रुपाली पाटील ठोंबरे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. निवडणुकीत निकालाच्या दिवशी मतमोजणीदरम्यान रुपाली पाटील ठोंबरे यांची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाल्याचंही समोर आलं.

निवडणूक पार पडल्यानंतर रुपाली ठोंबरे आजारी पडल्या आहेत. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट करत माहिती दिली.

रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, 'थोडा आराम,आरोग्याची काळजी. पुण्यात दोन प्रभागात निवडणुकीच्या प्रचारात,मतमोजणी दिवशी प्रक्रियेत प्रचंड धावपळीत,दगदग झाली. सर्वच उमेदवारांची होत असते जरा आरोग्याची रिव्हायटर करून परत १०० हत्तीचे बळ घेऊन तुमची बहीण रूपालीताई ताकदीने उभी राहील. जगदंब जगदंब'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2 तासांचा प्रवास आता 7 मिनिटांत होणार; प्रवासाचा वेळ वाचणार, मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू

Maharashtra Live News Update: ओबीसीचे नेते रणांगणात नव्हते म्हणून अजितदादांची राष्ट्रवादी संपली: लक्ष्मण हाके यांची टीका

Frizzy Hair: ड्राय आणि फ्रिझीनेसमुळे केसांची शाईन गेली? वापरा हा होममेड उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडीला सुरुवात? शिंदे गटानंतर ठाकरेंचे ११ नगरसेवक अज्ञातस्थळी

Horoscope Monday: रागावर ठेवा नियंत्रण, 5 राशींना मिळणार नवीन संधी, पैसाही टिकेल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT