Ajit Pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Latest Speech : मी शब्द फार जपून देतो, दिला तर पूर्ण करतो; भरसभेत अजित पवारांनी दिलं मोठं आश्वासन

Ajit Pawar in purandar : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुंरदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी आगामी निवडणुकीची पुढची दिशा स्पष्ट केली.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Ajit Pawar News :

येत्या दोन दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. अजित पवार गटानेही लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुंरदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी आगामी निवडणुकीची पुढची दिशा स्पष्ट केली. (Latest Marathi News)

'माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर गुंजवणे धरणात पाणी आणण्यासाठी निधी मंजूर करणार. एक तर मी शब्द फार जपून देतो, दिला तर पूर्ण करतो, असं म्हणत अजित पवारांनी यावेळी भरसभेत पुरंदरकरांना मोठं आश्वासन दिलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याळा हजेरी लावली. यावेळी इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सभेत अजित पवारांनी जिल्हा आणि तालुक्याच्या विकासकामांवर भाष्य केलं.

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे

१. व्हिजन असलेला नेता असला की देश पुढे जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक बदल करायचे आहेत. आता सर्वांनी घरे दिली जात आहेत. अनेक कामे सुरु आहेत. केंद्राने ५० टक्के निधी पाण्यासाठी दिला. ५० टक्के राज्य सरकार देत आहेत. कोटी रुपयांचे कामे सुरु आहेत.

२. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची बंधने नसतात. टँकर सुरु करण्यात आले आहेत. कांदा बाबतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखयमंत्री पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करत आहोत. 220 कोटी रुपये इतका निधी पुरंदर उपसा सिंचन योजनेला दिला आहे.

३. राज्य सरकारच्या विचारांचा आमदार निवडून गेला की निधी मिळतो. आज माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या, बारामती एवढं नाही पण बारामती सारखा विकास पुरंदरचा करून दाखवतो. पुरंदर उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालली तर सोमेश्वर कारखाना चांगला चालेल.

४. निवडणकी आल्या की वीज द्यायची... पण आता कायमस्वरूपी योजना सोलर पंप शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत. काही भागात बिबट्या फिरत आहेत म्हणून दिवसा पंप सुरू राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

५. अनेक लोक येतात जातात, राज्यात बघितलं तर धरण सुरू करणार,नारळ फोडले जातात पण काही होत नाही. मी नगरमधे निळवंडे धरण सुरू केलं.

६. नेतृत्वात धमक असली पाहिजे. काम करून घेण्याची हिंमत असली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT