Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी सपाची तिसरी यादी जाहीर, टीएमसीला दिल्या इतक्या जागा

Uttar Pradesh News: लोकसभेसाठी सपाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यात सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSaam Tv
Published On

Samajwadi Party News:

लोकसभेसाठी सपाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यात सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यासोबतच ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला एक जागा देण्यात आली आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही नगीनामधून आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला आहे.

याआधी येथे आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद निवडणूक लढवणार होते. सपाच्या नव्या यादीत बिजनौरमधून यशवीर सिंह, नगीनामधून मनोज कुमार, मेरठमधून भानु प्रताप सिंग, अलीगढमधून बिजेंद्र सिंह, हाथरसमधून जसवीर बाल्मिक, लालगंजमधून इन्स्पेक्टर सरोज यांना तिकीट देण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akhilesh Yadav
Maharashtra Politics: ठाकरे गट, दोन दिग्गज नेते, नाराजी अन् उद्धव ठाकरेंची मध्यस्थी...; छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीतरी मोठं घडतंय!

सपाने आतापर्यंत तीन याद्या केल्या जाहीर

अखिलेश यादव यांनी आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत 16 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 11 उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.  (Latest Marathi News)

Akhilesh Yadav
Fact Check: राहुल गांधींनी विठुरायाची मूर्ती नाकारली? BJP ने व्हिडीओ केला शेअर; पटोलेंनी पुराव्यानिशी दावा काढला खोडून

दरम्यान, टीएमसीचे ललितेशपती त्रिपाठी भदोही मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे नातू आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते. मात्र 2021 मध्ये त्यांनी वडील राजेशपती त्रिपाठी यांच्यासह टीएमसीमध्ये प्रवेश केला. 2012 मध्ये ललितेशपती यांनी मदिहानमधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पुन्हा एकदा ते लोकसभा निवडणूक लढवताना दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com