Maharashtra Politics: ठाकरे गट, दोन दिग्गज नेते, नाराजी अन् उद्धव ठाकरेंची मध्यस्थी...; छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीतरी मोठं घडतंय!

Thackeray Group News: एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे दोन बडे नेते आमनेसामने आल्याची बातमी मिळत आहे.
Uddhav Thackeray , Chandrakant Khaire, Ambadas Danve
Uddhav Thackeray , Chandrakant Khaire, Ambadas DanveSaam Tv
Published On

Chandrakant Khaire Vs Ambadas Danve:

एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे दोन बडे नेते आमनेसामने आल्याची बातमी मिळत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

मिळालाय माहितीनुसार, चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर येथे संपर्क कार्यालय सुरू केलंय. यावरून अंबादास दानवे नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे दानवे आणि खैरे यांच्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद नको यासाठी उद्धव ठाकरे यांनी खैरे आणि दानवे यांना मातोश्रीवर येण्यास सांगितलं, असं सूत्रांनी सांगितलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray , Chandrakant Khaire, Ambadas Danve
Fact Check: राहुल गांधींनी विठुरायाची मूर्ती नाकारली? BJP ने व्हिडीओ केला शेअर; पटोलेंनी पुराव्यानिशी दावा काढला खोडून

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. खैरे आणि दानवेंची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक पार पडली. त्यावेळी दोघांमध्ये समन्वय ठेवून काम करा, अशा सुचना केल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

दरम्यन, आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी आपल्या जालना जिल्ह्यातील सहकाऱ्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

Uddhav Thackeray , Chandrakant Khaire, Ambadas Danve
Government Schemes: व्याजाशिवाय मिळेल 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जबरदस्त आहे ही सरकारी योजना

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहे की, ''लाखे पाटील यांच्याविषयी मी जास्त एकही बोलणार नाही. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, यामध्ये ज्या बैठका सुरू होत्या, खासकरून आरक्षणाबाबतीत एक अभ्यासू व्यक्ती म्हणून ओळख झाली होती. मधल्या काळात मला असं वाटलं की, हे पण गेले की काय? पण तुम्ही एक चांगला निर्णय घेतला.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com