Jayant Patil Meet Ajit Pawar 
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राजकीय भूकंप होणार? अजित पवार अन् जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा|VIDEO

Jayant Patil Meet Ajit Pawar : जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. जयंत पाटील नाराज असतानाच या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार का?

Namdeo Kumbhar

Jayant Patil and Ajit Pawar : शरद पवार गटाचे जयंत पाटील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आज जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक होणार आहे. त्यासाठी दिग्गज नेते मंडळी आले आहेत. त्यावेळी जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यामध्ये बंद केबिनमध्ये चर्चा झाली.

जयंत पाटील आणि अजित पवार एकाच केबिनमध्ये एकत्र दिसून आले. वसंत दादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहे, त्यातच आता दोघांमध्ये झालेली चर्चेने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? अशी राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

पुण्यात आज वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अजित पवार आणि जयंत पाटील मांजरी येथील व्हीएसआयमध्ये दाखल सकाळीच दाखल झाले. त्यावेळी दोघांमध्ये बंद केबिनमध्ये अर्धा तास चर्चा झाली. जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहेस त्यातच बंद दाराआड झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे. चर्चेनंतर जयंत पाटील केबिनमधून बाहेर आले. जयंत पाटील खरेच शरद पवार यांची साथ सोडणार का? याची पुन्हा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

बैठकीला कोण कोण आले?

दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, जयंत पाटील, अजित पवार, शरद पवार यांच्यासह अनेक असे साखर उद्योगातील नेतेही या बैठकीला उपस्थित आहेत. हर्षवर्धन पाटील आणि दिलीप वळसे पाटील व्हीएसआयच्या पोर्चमध्ये शरद पवार यांच्या स्वागतासाठी उभे होते.

अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र येणार आहेत. त्याला निमित्त ठरतेय ते ⁠पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचे. या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र आले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची आज सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे. ⁠

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना सिग्नल, ना ट्रॅफिक; मुंबईतून थेट २५ मिनिटांत गाठा ठाणे, प्रकल्प कधी पूर्ण होणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडेंविरोधात धुळ्यात मराठा समाज आक्रमक

ज्यांना लोकांनी चार वेळा डांबर फासलंय त्यांच्यावर काही बोलायचं नाही उदय सामंत यांचा रोख कोणाकडे? VIDEO

Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याआधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू

Mumbai food: गरम चहा आणि बन मस्का....! मुंबईतील सुप्रसिद्ध इराणी कॅफेंना एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT