Maharashtra Politics Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule  Saam TV
मुंबई/पुणे

Baramati Politics: अजित पवारांकडून प्रचार सभांचा धडाका, आज बारामतीत ७ ठिकाणी सभा घेणार; लोकसभेचं रणशिंग फुंकणार?

Satish Daud

Ajit Pawar Vs Sharad Pawar Baramati

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेस आणि भाजपने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत काँग्रेसने एक तर भाजपने दोन याद्या जाहीर केल्या आहेत. या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान, उमेदवारी यादी जाहीर होताच राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत तब्बल ७ सभा घेणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बारामती लोकसभेची जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी या जागेवर अजित पवार गट निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आज (ता. १४) तब्बल ७ ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. सुपे, कोऱ्हाळे बुद्रुक, झारगडवाडी, करंजेपुल, माळेगाव बुद्रुक, नीरावागज व बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स या ठिकाणी सभा घेऊन अजित पवार आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत.

त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) नेमकं या सभेत काय बोलणार याकडे बारामतीकरांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. अजित पवारांनी सभेच्या पत्रकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रामदास आठवले यांचे व सुनेत्रा पवार यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

या पत्रकावर बारामती तालुका महायुती मित्रपक्ष यांचाही उल्लेख आवर्जून केला आहे. बारामती तालुक्यातील सर्व गावांतील कार्यकर्त्यांना या ७ सभांना वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रित केले असून, कार्यकर्त्यांनी या सभांना उपस्थित राहावे, असे आवाहन अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे.

दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदारसंघात सभा तसेच मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी देखील अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने निवडणूक आणखीच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT