"अजितदादा सर्वात फायद्यात, शिवसेनेवाले बिचारे फसले" - फडणवीसांची सेनेला कोपरखळी तर दादांची स्तुती Saam Tv
मुंबई/पुणे

"अजितदादा सर्वात फायद्यात, शिवसेनेवाले बिचारे फसले" - फडणवीसांची सेनेला कोपरखळी तर दादांची स्तुती

मुख्यमंत्री पद असूनही शिवसेनेने सर्वात कमी निधी मिळवला तर निधी मिळवण्यात राष्ट्रवादी सर्वात अव्वल राहीली याबाबत फडणवीसांनी शिवसेनेला चिमटा काढत अजित दादांचं कौतुक केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरले. मात्र आपल्या भाषणाच्या शेवटच्या भागात त्यांनी शिवसेनेला (Shivsena) चांगलाच चिमटा काढला आहे, तर दुसरीकडे मात्र उप-मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री पद असूनही शिवसेनेने सर्वात कमी निधी मिळवला तर निधी मिळवण्यात राष्ट्रवादी सर्वात अव्वल राहीली याबाबत फडणवीसांनी शिवसेनेला चिमटा काढत अजित दादांचं कौतुक केलं आहे. ("Ajit Dada is the most profitable in the government, ShivSena is the poor" - Fadnavis slammed the shivsena and praised ajit Dada)

हे देखील पहा -

काय म्हणाले फडणवीस?

विधान सभेत फडणवीस म्हणाले की, या सरकारमध्ये अजितदाद सगळ्यात फायद्यात आहे. जो निधी वाटप झाला त्याल राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) सर्वात जास्त म्हणजे २ लाख ५० हजार ३८८ कोटी रुपये मिळाले. दुसऱ्या नंबरवर असलेले कॉंग्रेसवालेही (Congress) हुशार निघाले, रोज तक्रार करुन करुन त्यांनी १ लाख १ हजार ७६६ कोटी रुपये निधी प्राप्त केला, आणि आमचे शिवसेनेवाले बिचारे हात वर करुन फसले, ज्यांचे युतीत सर्वात जास्त आमदार आहेत त्या शिवसेनेला फक्त ५४ हजार ३४३ कोटी रुपये मिळाले असं फडणवीस म्हणालेत.

कोणत्या पक्षानं किती निधी मिळवला होता?

शिवसेना (Shivsena) पक्षाचे ५६ आमदार असून शिवसेनेने ५४ हजार ३४३ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. काँग्रेस (Congress) पक्षाचे ४३ आमदार असून कॉंग्रेसने १ लाख १ हजार ७६६ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५३ आमदार असून राष्ट्रवादीने २ लाख ५० हजार ३८८ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. हे आकडे २०२०-२१ या वर्षात तिन्ही पक्षाला मिळालेल्या निधीचे आहेत. ज्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. ज्या शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT