सिंधुदुर्ग : भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचं बेताल वागणं आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. आधी विधानभवन परिसरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केलेली टिंगल आणि त्यानंतर आता शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला. या दोन्ही प्रकणावरुन आता शिवसेनेने नितेश राणेंना घेरण्याची तयारी केली आहे. (Shivsena vs BJP MLA Nitesh Rane over mocks Aaditya Thackeray and Santosh Parab Attack Case)
एकीकडे, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना म्याव-म्याव असा मांजराचा आवाज काढत डिवचल्याप्रकरणी आज हिवाळी अधिवेशनात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. शिवसेनेने नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या निलंबनासह त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शिवसेनेला डिवचणे नितेश राणेंना चांगलंच भोवलंय. शिवसेनेने नितेश राणेंना आता चारही बाजुंनी घेरण्याची तयारी केलीये, असं दिसतंय.
हेही वाचा -
म्याव म्याव करत आदित्य ठाकरेंची टिंगल
अधिवेशनाच्या (Winter Session) दुसऱ्या दिवशी (23 डिसेंबर) विरोधक विधान भवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी (Sloganeering) करत होते. यावेळी नितेश राणेही (Nitesh Rane) पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करत होते. इतक्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे विधान भवनात दाखल होण्यासाठी पायऱ्यांवरुन जात असताना नितेश राणेंनी चक्क 'म्याव-म्याव' असा मांजराचा आवाज (Cat Voice) काढत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण, आदित्य ठाकरे नितेश राणेंकडे दुर्लक्ष करत तिथून निघून गेले.
त्यानंतर, आज सभागृहात शिवसेनेच्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित करत आक्रमक अशी भूमिका घेतली. सभागृगात नितेश राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणेंच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली.
हेही वाचा -
सिंधुदुर्गात काय घडलं?
सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. तो नितेश राणे यांच्या कार्यकर्त्याने केला होता, असा आरोप आहे. त्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
याप्रकरणी कणकवली (Kankavli) पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दोन वेळा हजेरी लावली लावली होती. दोन दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे आणि त्यांचे सहकारी संदेश सावंत यांची कणकवली पोलिसांनी एक तास चौकशी केली होती. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केलीये.
तर, नितेश राणे यांचे सहकारी सचिन सातपुते यांना अटक झाल्यानंतर आमदार नितेश राणे आणि त्यांचे पीए हे सध्या नॉट रिचेबल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. रविवारी (26 डिसेंबर) रात्रीपासून त्यांचे फोन स्विच ऑफ येत आहेत. तसेच, ते आज दिवसभरही कुठेही दिसून आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, नितेश राणेंच्या वकिलांनी आज जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनही दाखल केला आहे, ज्यावर उद्या सुनावणी होणार आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.