हिवाळी अधिवेशन: म्याऊ-म्याऊ टिंगलीवरून शिवसेना आक्रमक; नितेश राणेंच्या निलंबनासह अटकेची मागणी

शिवसेना आमदार भास्कर जाधव हे आक्रमक झाले असून त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या निलंबनासह त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हिवाळी अधिवेशन: म्याऊ-म्याऊ टिंगलीवरून शिवसेना आक्रमक; नितेश राणेंच्या निलंबनासह अटकेची मागणी
हिवाळी अधिवेशन: म्याऊ-म्याऊ टिंगलीवरून शिवसेना आक्रमक; नितेश राणेंच्या निलंबनासह अटकेची मागणीSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्याऊ-म्याऊ असा मांजराचा आवाज काढत डिवचल्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना डिवचले होते. त्यामुळे आता शिवसेना आमदार भास्कर जाधव हे आक्रमक झाले असून त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या निलंबनासह त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. (Winter session: ShivSena attacks and Demand for arrest with suspension of Nitesh Rane)

हे देखील पहा -

हिवाळी अधिवेशन: म्याऊ-म्याऊ टिंगलीवरून शिवसेना आक्रमक; नितेश राणेंच्या निलंबनासह अटकेची मागणी
हिवाळी अधिवेशनात म्याव-म्याव...! नितेश राणेंनी मांजराचा आवाज काढत आदित्य ठाकरेंना डिवचले (पहा व्हिडिओ)

सभागृगात नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आणि नितेश राणे हाय हाय च्या घोषणा दिल्या, त्यानंतर विधानसभा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. नितेश राणे यांच्या म्याऊ म्याऊ वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक झाली आणि आमदार नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी शिवसेनेने केली. यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले की नितेश राणे यांना आधीच समज दिली असती तर... यांची हिंमत कशी होते? देवेंद्र फडणवीस तुम्ही त्यांना त्याच वेळी म्हणायला हवे होते असं बोलू नये. म्हातारी गेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो आहे. एक तर नितेश राणेंना निलंबित करा अन्यथा त्यांना हात जोडून माफी मागायला सांगा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

तर देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की, नितेश राणे यांच्याबाबत आम्ही आमची भूमिका आधीच सांगितली आहे. कुठल्याही सदस्यांनी असे वागू नये असे मी सांगितले. पण भास्कर राव मी एक सांगू शकतो ज्यावेळी भुजबळ साहेब बोलायचे तेव्हा हेच भास्कर जाधव त्यांना खूप खूप असे बोलायचे. आम्ही नितेश राणे यांचे समर्थन करत नाही. आमचे 12 सदस्य तुम्ही निलंबित केले, आता आणखी सदस्यांना निलंबित करण्याचा तुमचा डाव आहे. सरकारं बदलत असतात. असे पायंडे पाडू नका, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com