Maharashtra Live News Update Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या छतावर चढलेल्या युवकाला लागला विजेचा धक्का, नागपूर स्थानकातील घटना

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

रेल्वेच्या छतावर चढलेल्या युवकाला लागला विजेचा धक्का, नागपूर स्थानकातील घटना

मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वर असलेल्या रेल्वेच्या छतावर हा तरुण चढला होता. उच्चदाब वीज वाहिनी (ओएचई)च्या संपर्कात आल्याने रेल्वेच्या छतावरून पडून युवक गंभीर जखमी झालाय.

नागपूरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या कारला आग

* या घटनेत वाहनातील सर्व जण सुरक्षित..

* जिल्हा न्यायाधीश सायंकाळी साडे सहा वाजता दरम्यान घरी जात असताना न्यायालय परिसरात गाडीला अचानक आग लागली..

* गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येता, कारमधून सर्व जण खाली उतरले.. त्यामुळे कोणालाही इजा नाही..

* पोलिस घटनास्थळी दाखल,अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू..

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने पुन्हा गेवराईच्या शिंगरवाडीत थोपटले दंड.

लक्ष्मण हाके यांचं शृंगार वाडीत जोरदार स्वागत आमदार विजयसिंह पंडित यांच्या मतदारसंघातील शृंगारवाडीत पुन्हा लक्ष्मण हाके यांनी दंड थोपट आमदार विजयसिंह पंडित यांना चॅलेंज केले आहे.

शृंगारवाडी मध्ये लक्ष्मण हाके यांच जोरदार स्वागत करण्यात आला आहे.

लक्ष्मण हाके यांनी या अगोदरही गेवराई मध्ये येऊन दंड थोपटले होते आता पुन्हा दुसऱ्यांदा शृंगारवाडी मध्ये दंड थोपटले आहेत

लक्ष्मण हाके सभेमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष..

परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस

परभणी जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाने हजेरी लावली आहे सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर सर्वत्र वाढलाय त्यातल्या त्यात पूर्णा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे थूना नदीला पूर आलाय माटेगाव येथील जुन्या पुलावरून ही पाणी वाहत असल्याने झिरो फाटा ते पूर्णा रस्ता बंद झाला आहे तर थुना नदीकाठच्या पिंपळा लोखंडे,हिवरा,वाई आहेरवाडी,रिदुरा या पाच गावांचा संपर्क तुटला असून शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी झाले आहे त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाला आहे.

Nagpur : अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाण पुलाचे लोकार्पण होणार

- नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौक पर्यंतच्या उड्डाण पुलाचे लोकार्पण थोड्याच वेळात होणार आहे...

- या नवनिर्मित उड्डाणपुलाला काँग्रेसचे दिवंगत नेते 'ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल' असं नाव देण्यात आले आहे...श्रीकांत जिचकार हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते होते

- 2.85 किलोमीटर लांबीच्या 191 कोटी खर्चून ह्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे..

Pune : ड्रोन लाईट शोद्वारे पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनी उजळणार पुण्याचे आकाश

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून मिळणार अनोख्या शुभेच्छा

ड्रोन लाईट शोद्वारे पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनी उजळणार पुण्याचे आकाश

अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच आयोजन

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतील उपक्रम

३-४ किलोमीटरहूनही दिसणार ड्रोन शो !

Amravati : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात धुव्वाधार पावसाची हजेरी

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे चांदूर रेल्वे शहरातून बायपासकडे व नांदगाव खंडेश्वर कडे जाणाऱ्या मार्गावरील नदीवरील पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले. त्यामुळे हा मार्ग काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, सदर नदिवर संरक्षणात्मक कठडे नसल्याने नदि आणि रस्ता एकसमान दिसत होते. यामुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. तसेच, या नाल्याच्या जवळच असलेल्या रेल्वे ब्रिजखालील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले.

Hingoli : हिंगोलीत तुफान पावसाला सुरुवात

हिंगोलीत तुफान पावसाला सुरुवात

परतीच्या पावसाने शहरात हाहाकार

शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी तर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहायला सुरुवात वाहतूक व्यवस्था बंद

इंदिरा चौक,गांधी चौक परिसरात किरकोळ व्यापाऱ्यांचे साहित्य भिजले

Pune : पुण्यात मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस

पुण्यात मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस

शहराच्या अनेक भागात संततधार पाऊस

गेले काही दिवस शहरात पावसाने विश्रांती घेतली होती

वैभववाडी करुळ घाट उद्या 13 सप्टेंबर पासून वाहतुकीस होणार सुरू

वैभववाडी करूळ घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे काम पुर्ण झाले असून उद्या १३ सप्टेंबरपासून वाहतूक पूर्ववत सुरू होणार आहे. गेले आठ ते नऊ दिवस धोकादायक दरड हटविण्याचे काम सुरू होते. तज्ञ अभियंत्यांच्या देखरेखीखाली घाट मार्गातील दरड पुर्णपणे हटविण्यात आली असून आता उद्या पासून या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासून करूळ घाटमार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Pune : पुण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने बक्षीस वितरण समारंभ

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने बक्षीस वितरण समारंभ

अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित

Hingoli: हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपले

हिंगोली -

हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपले

कळमनुरी तालुक्यातील सोडेगावमध्ये ओढ्याला पूर

गावकऱ्यांचा संपर्क तुटला

गावकऱ्यांना गावाच्या वेशीवर अडकले

Solapur: अक्कलकोट तालुक्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

सोलापूर -

अक्कलकोट तालुक्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावातील फत्तेसिंह शिक्षण संस्थेतील सांगवी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यामुळे शिक्षणापासून राहावं लगत आहे वंचित

बोरी नदीच्या काठावर असणाऱ्या सांगावी प्रशालेला बसला अक्कलकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका..

जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांना या पुराच्या पाण्याचा बसतोय फटका,तर विद्यार्थ्यांचे प्राणांगण ही झाले चिखलमय

Kalyan: कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात खासगी रुग्णवाहिकाचे मनमानी दर

कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात खासगी रुग्णवाहिकाचे मनमानी दर

मनसे आणि ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा

प्रशासनाला धारेवर धरलं कारवाईसाठी दिले निवेदन

Hingoli:  हिंगोलीत शेतकऱ्यांची हळद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भिजली

हिंगोली -

हिंगोलीत शेतकऱ्यांची हळद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भिजली

शेतकऱ्यांचा संताप अनावर

आम्ही शेतात हळद सुरक्षित ठेवली मात्र बाजार समितीमध्ये हळद भिजल्याने शेतकरी संतापले

देशात सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

बाजार समितीमध्ये हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू

Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

कोल्हापूर -

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

दुपारपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात

शहरात मात्र पावसाची उघडीप

Nashik: मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला नाशिक पोलीस आयुक्त

नाशिक -

- मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला नाशिक पोलीस आयुक्त

- शासकीय विश्रामगृह येथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक दाखल

- कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा घेऊन मोर्चात नेत्यांनी केला होता सवाल उपस्थित

- तर राहुल धोत्रे खून प्रकरणातील संशयित आरोपी उद्धव निमसे फरार असल्यानं राऊतांनी केले होते गंभीर आरोप

- भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसे शासकीय बंगल्यात लपल्याचा संजय राऊतांनी केला होता दावा

- भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं

Nanded: बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, अर्धापूर तहसील कार्यालयावर मोर्चा

नांदेड -

बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या.

बंजारा समाजाचा अर्धापूर तहसील कार्यालयावर मोर्चा.

बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करा.

बंजारा समाजाचा जलभरो आंदोलन करण्याचा इशारा

Solapur: प्रणिती शिंदे यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

सोलापूर -

- काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

- प्रणिती शिंदे यांच रौद्ररूप

- खासदार प्रणिती शिंदे यांनी खासदार निधीतून 40 कोटी रुपये दिले होते

- त्या ४० कोटी रुपयांच्या कामाचा लेखाजोखा मागितल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे या अधिकाऱ्यांवर भडकल्या

Washim: वाशिम शहरातील पुसद नाका चौक परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे

वाशिम -

पुसद नाका चौक परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे

वाशिम शहरातील पुसद नाका चौक परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे

वाहनधारकांना या मार्गावरून जाताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.

या रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दररोज अपघात घडत असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

Pandharpur: आरोपांवर कायदेशीर भाषेत उत्तर देईल - धैर्यशील मोहिते पाटील

पंढरपूर -

आपल्यावरील आरोपांवर कायदेशीर भाषेत उत्तर...

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया

कुर्डूतील अवैध मुरूम प्रकरणात आरोपींना अटक का नाही ?

Bombay High Court: मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती

त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हायकोर्टात असणाऱ्या सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि इतर स्टाफ यांना हायकोर्टाच्या बाहेर जाण्याची विनंती करण्यात आलेली आहे..

सर्वजण मुंबई हायकोर्टाच्या बाहेर पडत आहेत

Nashik: नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात

- बी डी भालेकर मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

- नाशिक महापालिकेतील भ्रष्टाचार, खड्डे, वाढती गुन्हेगारी ड्रग्स हनीट्रॅप, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह अन्य प्रश्नांवर दोन्ही पक्षांचा जन आक्रोश मोर्चा

- दोन्ही पक्षातील मुंबईचे वरिष्ठ नेते मोर्चात सहभागी

- हातात काळे झेंडे घेऊन मोर्चेकरी आंदोलनात सहभागी

माधुरी हत्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय

हाय पॅावर कमिटीकडे निर्णय घेण्याचा अधिकार

वनतारा व शासन मिळून सर्व सुविधा नांदणी येथे उपलब्ध होणार.

नांदणी मठाकडून हाय पॅावर कमिटीकडे सोमवारी हत्ती मागणीसाठी अर्ज सादर करणार.

राजू शेट्टी यांची माहिती

Jalna: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका, जालन्यात आदिवासी समाजाचा मोर्चा...

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज जालन्यात आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येतोय.जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्यांमध्ये विविध ठिकाणी बंजारा समाजाचे आंदोलन सुरू आहे. बंजारा समाजाच्या याच मागणीला विरोध करत आज जालन्यात देखील आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येतोय.

Beed: बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 22,515 कुणबी नोंदी सापडल्या तर 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

न्यायमूर्ती शिंदे समितीचे राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. या नोंदीच्या आधारे वंशावळ जोडुन काही पुरावे सादर केल्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले जात आहे. यामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सर्वाधिक धग असलेल्या बीड जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 22 हजार 515 नोंदी सापडल्या असुन या नोंदीच्या आधारे तब्बल 1 लाख 66 हजार 327 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या जन आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी

- थोड्याच वेळात नाशिकच्या बी डी भालेकर मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

- मोर्चेकऱ्यांसाठी जेवणाचा खास मेन्यू, मसाले भात आणि शिरा

- मोर्चा सुरू होण्याआधीच मैदानावर मोर्चेकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

Khed: खेड तालुक्यातील फुरूस पोयनार रस्त्याला मोठे भागदड

खेड दापोली मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या फुरूस गावातून पोयनार गावाला जोडणारा रस्ता

रस्त्याच्या मध्यभागी भगदाड

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच हा रस्ता नव्याने बांधण्यात आला होता

या रस्त्याच्या खाली मोठे भगदाड देखील तयार झाल्याचं चित्र

Mumbai: ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरेंच्या सेनेचे आणि आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

प्रभादेवी सर्कलवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

प्रभादेवी सर्कल येथील कामावरून दोन्ही गटात वाद

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर असल्याचा दावा

दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

याअगोदर देखील प्रभादेवी येथील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा वाद झाला होता...

दोन वर्षांपूर्वी प्रभादेवी येथे सदा वनकर आणि महेश सावंत यांचा वाद झाला होता...

दोन्ही गटाच्या वादामुळे वारंवार माहीम दादर विधानसभा चर्चेत आहे....

Mumbai: मुंबई उपनगरात आता NA कर लागणार नाही

मुंबईकरांसाठी मोठी घोषणा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्षानुवर्षांची मागणी मान्य केली

मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती

उपनगरात बांधलेली घरे व बांधकामांना एनए कर भरावा लागत होता

इमारत व घरे बांधल्यानंतर ही एनए कराचा भुर्दंड भरावा लागत होता

मंत्री बावनकुळेंकडून करमाफीचा निर्णय

बुलढाण्यात जिल्ह्यातील बंजारा समाज आक्रमक ..

ज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिले आणि हैद्राबाद गॅजेट्स लागू केले, त्याचप्रमाणे राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे आणि हैद्राबाद गॅजेट्स लागू करावे, या मागणीसाठी आता बंजारा समाज आक्रमक झाला असून आज बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील वर बंजारा समाजाने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले. . तर आज जिल्ह्यात ठिकठिकाणी बंजारा समाजाच्या बैठका घेत आहोत, उद्या राज्यातील समाजाला घेऊन मुंबई गाठणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय..

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची बीडच्या गेवराईतील शृंगारवाडीत सभा

मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजही आक्रमक होताना पाहायला मिळत आहे सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर आणि जीआर काढल्यानंतर लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या सर्वांचा धडाका बीडमध्ये पाहायला मिळत आहे बीडच्या गेवराई मतदार संघामध्ये लक्ष्मण हाके यांची आठवड्या मधली ही तिसरी सभा आहे गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी येथे लक्ष्मण हाके यांच्या सभा होत असून सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून रास्ता रोको आंदोलन

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या कंधार तालुक्यातील कौठा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. नांदेड ते बिदर हा राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी जवळपास तासभर रोखून धरला. नांदेडच्या कंधार तालुक्यातील मन्याड नदी खोऱ्यात एका दिवसात 275 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. हा पाऊस शासकीय नुकसान निकषाच्या तीन पट जास्त पडला. या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणारी मदत अत्यंत तोडकी असणार आहे. त्यामुळे शासनाने खरडून गेलेल्या शेतीसाठी हेक्टरी एक लाख रुपये, पूरबाधित शेतकऱ्यांसाठी हेक्‍टरी 50 हजार रुपये, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतीसाठी हेक्टरी तीस हजार रुपयाची मदत देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. यासोबतच शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देखील करावी, आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेली आहे अशा कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. या रास्ता रोको आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोल्हापूरात नवरात्रोत्सवात गर्दी नियंत्रणासाठी होणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

यंदा नवरात्रोत्सव तब्बल अकरा दिवसांचा आल्यामुळे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची विक्रमी गर्दी अपेक्षित आहे. या गर्दीच्या नियोजनासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तयारी सुरू केली असून, गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. यासाठी भोपाळ आयआयटी येथील तज्ज्ञ टीम नवरात्रोत्सवाच्या काही दिवस आधी कोल्हापुरात दाखल होणार आहे.

Beed: कुणबी प्रमाणपत्र प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला बीडमध्ये गती.

गाव खेड्यात कार्यशाळा बीड जिल्ह्यातील गावागावात अधिकारी पोहोचले.

बीडच्या साक्षाळ पिंपरीत कार्यशाळा.

उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर बीड जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रियेला गती मिळताना पाहायला मिळत आहे.

जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडून गावागावात जाऊन कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं त्याचे प्रोसिजर कशी आहे याची कार्यशाळा घेतली जात आहे.

Chakan: चाकणमधील अतिक्रमणे जमीनदोस्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या दौऱ्यानंतर चाकणमधील अतिक्रमणे जमीनदोस्त

शासकीय यंत्रणांकडून थेट कारवाई

पीएमआरडीएने थेट कारवाई सुरू केली असून पोलीस बंदोबस्तात 150 हून अधिक अतिक्रमणावर कारवाई केली आहे.

21 होल्डिंगही हटवण्यात आली आहेत

पुणे नाशिक महामार्गावर तळेगाव चौक ते एकता नगर रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आले असून 150 अतिक्रमणे काढण्यात आली आहेत

या अगोदर या सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजविण्यात आल्या होत्या

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी साडेबावीस मीटर अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत

चाकण चौक आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही महत्त्वाची पावले उचलली गेली असल्याचे बोलले जाते.

सी.पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ

सी. पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला. सी.पी राधाकृष्णन हे १५वे उपराष्ट्रपती आहेत.

NAGAR-लहान मुलांना भिक्षा मागायला लावाल तर आता तुरुंगाची हवा 

शिर्डीत भिक्षेकऱ्यांची वाढलेली संख्येचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना आता भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा सर्रास वापर होत असल्याचं समोर आलंय.. ज्या वयात पाठीवर दप्तर आणि हातात पुस्तकं असायला हवीत, त्या कोवळ्या वयात खांद्यावर हार-फुलांची टोपली आणि भिक्षेसाठी पुढे पसरलेले हात, हे चित्र शिर्डीच्या रस्त्यांवर दिसायला लागलंय.. साईंच्या दारात दररोज दिसणारे हे वास्तव बदलण्यासाठी आता शिर्डी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.. भिक्षा मागणाऱ्या 12 मुलांची सुटका करत त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. बालकल्याण समितीने या सर्व मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहांमध्ये  केली असून तिथे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार आहे.. पोलिसांच्या या कारवाईमुळे बालमजुरी आणि बालभिक्षेकरी प्रवृत्तीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..

नवी मुंबईतील BMTC कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार

नवी मुंबईतील BMTC कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळेल, अशी माहिती आमदार विक्रांत पाटील यांनी दिली. तब्बल ४१ वर्षानंतर BMTC कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार आहे. अंतिमत: ६३१ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा मोबदला मंजुर झाला. नगरविकास विभागाकडून सिडकोच्या मोबदला प्रस्तावाला मंजुरी

Maharashtra Live News Update: राज्यात उद्रेक निर्माण होतोय, त्यावर बोला - छगन भुजबळ

तुम्हाला १० टक्के आरक्षण नको का? तुम्हाला ews नको, तुम्हाला ओपन नको? त्यामुळे तुमचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल का? मराठा नेत्यांनी उत्तर द्यावं, असे छगन भुजबळ म्हणाले.

Nitin Gadkari | माझ्याविरुद्ध पैसे देऊन राजकीय मोहीम, नितीन गडकरींचा मोठा आरोप

 पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम चालवली जात आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय परिवहन आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल मिश्रित इंधनाबद्दल बरीच चर्चा झाली. याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ते सोशल मीडियावर पैसे देऊन केलेल्या राजकीय मोहिमेचे बळी ठरले आहेत.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली

- लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमंडली असल्याचा आरोप करणारी राज्य शासनाने हा आरोप साफ फेटाळला, नागपूर खंडपीठात सूनावनी

- महालेखापालांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार राज्याची २०२४-२५ ची वित्तीय तूट ही २.६९ टक्क्यांच्या आसपास असेल असल्याचं नमुड करण्यात आलं..

- लाडक्या बहिणीसारख्या कल्याणकारी योजनांमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडत असल्याचा

- आरोप याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवर यांनी केला होता..

- राज्य शासनाने शपथपत्र दाखल करीत हा दाखल खोटा असल्याचे नमूद केले.

- महाराष्ट्र वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियमांनुसार वित्तीय तूट हे तीन टक्क्यांपेक्षा कमी असायला हवी. त्यामुळे कायद्यातील तरतुदीचे काटेकोर पालन केलं जातं असल्याचं सांगण्यात आले..

- किंबहुना सर्वाधिक कमी वित्तीय तूट असलेल्या देशातील तीन राज्यांत महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. त्यामुळे कल्याणकारी योजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो आहे...वित्तीय तूट वाढत असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा चुकीचा व असमर्थनीय असल्याचा प्रतिदावा

- याचिकाकर्त्याच दावा अजूनही कायम आहे, अनेक योजनांवर परिणाम झाला असाही दावा करण्यात आला..

Latur : दहशत माजवणाऱ्या गावगुंडांची पोलिसांकडून धिंड

लातूरच्या कळंब रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी हातात कोयता घेऊन एका चहाच्या हॉटेलवर तोडफोड करत एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती, दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील पाच आरोपींची पोलिसांनी लातूरच्या कळंब रोड परिसरातून धिंड काढली आहे.

सोलापूर : कुर्डू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या वायरल कॉल मुळे सध्या कुर्डू गाव चांगले चर्चेत आहे. याच कुर्डू गावात मुरूम उत्खनना प्रकरणी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. तसेच कुर्डू गावची बीडशी होत असणारी तुलनेच्या निषेधार्थ आज कुर्डू गावात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासून कुर्डू गावात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सकाळी साधारण 11 वाजता कुर्डू गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन बंदच्या काळात निषेध व्यक्त करणार आहेत.

पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात शिरून चेन स्नॅचिंग.. सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद

शहरात भरदिवसा आता लुटमार चेन स्नैचिंग आणि मोबाइल हिसकावण्याच्या घटना वाढत आहे.. यातच अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चक्क भर दिवसा चक्क पार्सल देण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आणि भीतीच वातावरण निर्माण झालंय..

- अश्विनी मेश्राम असं महिलेच नाव आहेय... घरी एकट्या असताना अज्ञात आरोपी पोहचला... अज्ञात चोरट्याने हेल्मेट घालून पार्सल द्यासाठी आल्याची बतावणी केली.

- अश्विनी यांना मुलीने जेवणाचे पार्सल पाठविले असावे, असे वाटल... त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला. आरोपीने दिलेल्या कागदावर सही करू लागल्या. अचानक आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले.

- यावेळी गळ्यातील तीन ग्रॅम सोनेच आरोपीच्या हातात गेले.... ते घेऊन त्याने पळ काढला. त्याची सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय..

- अश्विनी यांनी आरडाओरड केली. लोक येईपर्यंत चोरटा फरार झाला. अश्विनी यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.. आरोपीचा सीसीटीव्ही आधारे अजनी पोलिस शोध घेत आहे..

jalgaon : ज्येष्ठ नागरिकाला घातला ५३ लाखांना गंडा

जळगाव जमीन अधिग्रहण व्यवसायात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाला ५३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दोन संशयित आरोपींनी जमीन अधिग्रहण व्यवसायातून ५ ते ६ पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले त्यांनी परतफेड करण्याचे आश्वासन देऊन यांच्याकडून बँकेतील खात्यातून तसेच रोख स्वरूपात ५३ लाख ४० हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर त्यांनी पैसे परत न देता त्यांना धमकावले. या फसवणुकीची तक्रार गोपाळ राठी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यावर हि कारवाई करण्यात आली आहे

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पिकअप गाडी आणि कारचा अपघात, ३ ठार, १२ जखमी

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ताहाराबाद-मुल्हेर रस्त्यावर अंतापूर शिवारात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप व कार यांच्यात अपघात होऊन तीन मजूर ठार तर १० ते १२ मजूर जखमी झाले आहे.आयशर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला,अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत मदत कार्य करुन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले,तान्हाजी सोनवणे,शंकर आवीस,आशा सोनवणे अशी ठार झालेल्या मजूरांची नाव आहेत.

MUMBAI | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडली मुंबई भाजपची महत्वपूर्ण बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडली मुंबई भाजपची महत्वपूर्ण बैठक

मुंबई महापालिकेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' बंगल्यावर बैठक संपन्न

मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम होते उपस्थित

मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्याने चाचपणी

येत्या मंगळवारी मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन

Maharashtra Live News Update: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील आष्टीकर यांचे निधन

हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील अष्टीकर यांचे निधन झाले.वयाच्या 51 व्या वर्षी मुंबईच्या  जसलोक रुग्णालयात सुषमा पाटील आष्टीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर नांदेडच्या हदगाव तालुक्यातील आष्टी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्यविधीसाठी खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्यासह विविध पक्षातीलराजकीय नेते परिसरतील नागरिक नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Maharashtra Live News Update:  रत्नागिरीत ACB ची कारवाई, तीन लोकसेवक अटक

रत्नागिरीत लचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील वर्ग-१ अधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी तब्बल २४,००० रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती १६,५०० रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. एकाच वेळी तीन लोकसेवकांना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने, रत्नागिरीच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी दोन वाजेपर्यंत बंद

राष्ट्रीय महामार्ग आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता असल्याने पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत

jalna : विशेष मोहिमेत तब्बल 209 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई,कारवाईत 6 लाख 38 हजार रुपयांचा दंड वसूल...

जालन्यात अल्पवयीन वाहन चालकांविरोधात वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत तब्बल 209 अल्पवयीन वाहन चालक आढळून आले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 6 लाख 38 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांकडून अपघात होणे, चालक स्वतः जखमी होणे आणि इतरांना दुखापत होणे अशा तक्रारी वाहतूक शाखेकडे येत होत्या. त्यावरून वाहतूक शाखेने जालना शहर आणि जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून तब्बल 209 अल्पवयीन वाहन चालकांना पकडले. या कारवाईदरम्यान पालकांना समज देऊन, पालक आणि अल्पवयीन चालकांना मोटार वाहन कायद्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. या विशेष मोहिमेत तब्बल 6 लाख 38 हजार रुपयांचा दंड वाहतूक शाखेने वसूल केलाय.

तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी

तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.नवरात्र उत्सव कालावधीत देवीचा छबिना मिरवणूक वाघ ,सिंह, हत्ती घोडा, मोर, गरुड या वाहनांवर काढली जाते.त्याला रंगरंगोटी केली जात आहे.तुळजापुरातील पोतदार कुटुंबीय हे काम करत.दोन पिढ्यांपासून त्यांच्याकडून ही सेवा केली जात आहे.

जिल्ह्यातील 425 झेडपीच्या शाळेत एकही महिला शिक्षिका नाही, मुली शारीरिक व मानसिक समस्या कुणाला सांगणार?

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण हे अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मासिक पाळी शारीरिक बदल किंवा इतर वैयक्तिक समस्या यावर मुली, ह्या पुरुष शिक्षकांशी संवाद साधू शकत नाहीत, त्यामुळे अशा संवेदनशील विषयांवर महिला शिक्षिका विद्यार्थिनींना मार्गदर्शक समुपदेशन करू शकतात, मात्र लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 425 शाळेत महिला शिक्षिका नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे, मात्र महिला शिक्षिका नसल्यामुळे मुलींन पुढे ही,नवीन समस्या उभा टाकली आहे. विशेषता उदगीर आणि अहमदपूर तालुक्यातील झेडपीच्या शाळेत एकही महिला शिक्षिका नसल्याची आश्चर्यकारक माहिती देखील समोर आली आहे. जिल्ह्यातील 4 हजार 856 शिक्षकांपैकी 1हजार 684 इतकीच महिला शिक्षकांची संख्या आहे..

मुलाच्या खून प्रकरणात आई- प्रियकराराला जन्मठेपाची शिक्षा

यवतमाळच्या नेर तालुक्यातील मोझर येथे कमल चव्हाण तीन ऑगस्ट 2020 ला रात्री आठ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता तो परत घरी आला नाही दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता जावयाने नेर पोलीस ठाणे गाठून कमाल चव्हाण समशानभूमीत पडून असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी समशानभूमी गाठून पाहिणी केली असता त्याच्या गळ्यावर तसेच चेहऱ्यावर धारधारशस्त्राने हल्ला केल्याचे उघडकीस आले त्यानंतर मृताची आई यांनी नेर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्या विरोधात तक्रार दिली दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला पाच दिवसाच्या तपासानंतर प्रत्यक्षदर्शी पंकज कावरे याला संशयाच्या कारणातून पोलिसांनी विचारपूस केली. मृत्ताची आई शोभा चव्हाण आणि प्रियकर नरेंद्र ढेंगाळे या दोघांनी संगणमत करून कमल याला राहत्या घरात जीवानिशी ठार मारून गावातील समशानभूमीत नेऊन टाकल्याची कबुली पोलीस समोर आरोपींनी दिले त्यावरून पोलिसांनी दोघांनाही 10 ऑगस्ट 2020 ला अटक केली घरातील लोखंडी सराट्याने त्याला ठार मारल्याची कबुली दोन्हीही आरोपींनी पोलिसांना दिली.

Nashik News : नाशिकमध्ये आज मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र दिसणार

- मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये संयुक्त जन आक्रोश मोर्चा

- मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचे नेते राहणार उपस्थित

- मोर्चाला खासदार संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबईतील काही नेते राहणार उपस्थित

- पालिकेतील भ्रष्टाचार, खड्डे, वाढलेली गुन्हेगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह जिल्ह्यातील अन्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संयुक्त मोर्चाचे नियोजन

- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत असतानाच नाशिकमधील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चाला महत्व

- संयुक्त जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही पक्ष करणार आज नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन

- मुंबईनंतर नाशिकमधील प्रश्नांवर पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येऊन काढणार मोर्चा

- दोन्ही पक्षांकडून मोर्चाची जय्यत तयारी

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाकडून नागपूर खंडपीठात धाव

- राज्य सरकारने 2 सप्टेंबर काढण्यात आलेल्या शासन जीआरचा विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाकडून नागपूर खंडपीठात धाव

- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी यांनी केली याचिका दाखल.

- सरकारने त्या परिपत्रकात घोळ करत परिपत्रक काढलेत.. दोन दोन कागद काढले एका कागदात एक विषय आणि दुसऱ्या पत्रकात दुसरा विषय त्यात शब्द बद्दलविण्यात आल्याचा आरोप..

- या परीपत्रकाच मूल्यांकन आणि अभ्यास केला... हा जीआर ओबीसीच्या विरोधात जाणारा आहे, मराठा व्यक्तीला कुणबी बनविण्याचा प्रयत्न असून त्याचा निषेध नोंदवला आहे..

- मागासवर्गीय वैध ठरवण्यासाठी ज्या कार्यपद्धतीच्या अवलंब केला जातो, त्या विरोधात जाऊन हे परिपत्रक विशेष समाजासाठी फायदा पोहोचवण्यासाठी हे काढल असल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे..

- ही कार्यपद्धती अवैध आहे याच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली आहे.

- कदाचित सोमवारी याचिकेकर सुनवाई होईल यावर कोर्ट काय निर्णय देईल याकडे आमचं लक्ष आहे.

Nagpur: 18 सप्टेंबर रोजी महिला आयोगाची नागपुरात जनसुनावणी

"महिला आयोग आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन भवनात सकाळी 11 वाजता जनसुनावणीचे आयोजन..

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तक्रारीची सुनावणी घेणार..

महिलाना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रतक्ष उपस्थित राहणे आर्थिक दृष्ट्या तसेच ईतर कारणामुळे शक्य होत नाही..

त्यामुळे महिला आयोग जिल्हास्तरावर पोहचून महिलांच्या तक्रारीची सुनावणी घेत आहे..

या जनसुनावनीला पोलिस, जिल्हा प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक जिल्हा समन्वयक आदी उपस्थित राहतील..

तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करून, तक्रारी मांडणाऱ्या महिलाना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करणार..

Pune crime : चोरीची रिक्षा,मध्यरात्री प्रवाशांना लुटणाऱ्या चार आरोपींना बेड्या

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अजब प्रकार

चोरीच्या रिक्षातून प्रवासी भाडं घेत प्रवाशांना मारहाण करत लुटणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रिक्षात चोरत दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जात आरोपी प्रवाशांची करत होते लूट

लोणी काळभोर पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह तिघांना केली अटक

पुणे -सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती हद्दीत रिक्षातील प्रवासी इसमाला मारहाण करत आरोपी करत होते चोरी

अदिल लतीफ शेख, (वय -24), हबिब सिराज शेख, (वय 21), बबलु मुन्नालाल अग्रवाल, (वय-19, रा. गल्ली नं -3, रा. सय्यद नगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

Pune News : पुण्यात अपघाताचा बनाव रचून मोबाईल लुटणारे तिघेजण ताब्यात

रात्रीच्या अंधारात अपघाताचा बनाव रचून तरुणाला मारहाण करून दोन मोबाईल लुटणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत.

फिर्यादी सहा सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चव्हाणनगर कमान चौकाजवळून निघाले होते. त्यावेळी कात्रजकडून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

फिर्यादी खाली उतरल्यावर आरोपींनी उलट त्यांना शिवीगाळ केली.‘आम्हाला पायाला लागले, दहा हजार रुपये खर्च दे,’ अशी दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादीचे दोन मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला येथील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नराधमाच्या क्रूर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारामुळे मुलीच्या गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्या होत्या.त्यामुळे मुलीच्या गुप्तांगांवर मोठी शस्त्रक्रिया करून तिच्यावर उपचार करण्यात आल्याचा उल्लेख करत विशेष न्यायाधीश यांनी हा निकाल दिला.

याबाबत मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार बापावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाच फेब्रुवारी २०१८ ला हा प्रकार घडला होता.

कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलपासून लवकरच दिलासा?

Raju Shetti Petition : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही . त्यानुसार कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात माजी खासदार राजू यांनी दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही . त्यानुसार कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात माजी खासदार राजू यांनी दाखल केली.

Ambegoan मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला; भुयार आढळल्याने खळबळ 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर शहरात मध्यवर्ती भागातील दर्ग्याखाली (मशिदीखाली) सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. या ठिकाणी भुयारासारखी रचना दिसून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त लावून पाहणी केली असता, भुयारात कबर व्यतिरिक्त काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यामुळे रात्री उशिरा तणाव निवळला असून मुस्लिम समाजाच्या वतीने मंचर नगर पंचायत व पोलिस प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये सात बांग्लादेशी घुसखोर पकडले

अंबरनाथमध्ये बुधवारी पोलिसांनी ७ बांग्लादेशी घुसखोरांना बेड्या ठोकल्या. शिवगंगा नगर आणि कल्याण परिसरात ते भाड्याने वास्तव्यास होते. पकडलेल्या घुसखोरांमध्ये सहा महिला आणि एक पुरुष असून त्यात शिपा बलून पठाण, शर्मिन मोनेरुल इस्लाम, रिमा सागर अहमद, सुमया अबुल कासिम, पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर, जोया जास्मिन मतदार आणि रॉकी रहीम बादशाह यांचा समावेश आहे. हे सर्व परत विमानाने बांग्लादेशात पाठवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान, या कारवाईनंतर शहरात एटीएस आणि एनआयएने पाकिस्तानी नागरिक पकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं जप्त केल्याची अफवा पसरली होती. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि त्यावर विश्वासही ठेवू नये, असं आवाहन परिमंडळ ४ चे डीसीपी सचिन गोरे यांनी केलं.

भारतीय नौदलाला पहिले स्वदेशी सर्व्हिलान्स रडार 3D-ASR-Lanza-N मिळाले

भारतीय नौदलाला पहिले स्वदेशी सर्व्हिलान्स रडार 3D-ASR-Lanza-N मिळाले आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने स्पॅनिश कंपनी इंद्रासोबत तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या मदतीने हे विशेष रडार बनवले आहे. असे रडार बनवणारी ही पहिलीच भारतीय कंपनी आहे. संरक्षण स्वावलंबनाच्या भारताच्या प्रयत्नात ही कामगिरी एक महत्त्वाचे पाउल मानले जाते. 

रडारला या युद्धनौकेवर बसवण्यापूर्वी, त्याच्या विस्तृत समुद्री चाचण्या घेण्यात आल्या आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने या संदर्भात एक प्रेस रिलीज देखील जारी केली आहे. यामध्ये कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुकरण सिंह म्हणाले, इंद्रा कंपनीसोबतचे आमचे सहकार्य भारतातील रडार उत्पादन क्षमता मजबूत करण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. जमीनवरील समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि मजबूत पुरवठा साखळीद्वारे आम्ही प्रगत संरक्षण तंत्रज्ञानासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

Dry Lips Tips: ओठ खूपच कोरडे पडलेत? मग या घरगुती टिप्सने करा मऊ अन् मुलायम

Increasing arthritis: २०-४० वयोगटातील लोकांना संधिवाताचा धोका वाढला, 'या' एका कारणाने बळावतेय समस्या

Almond Benefits: दररोज सकाळी बदाम खाताना खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT