Maharashtra Live News Update Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२५, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर मोर्चा, कबुतरखाना वाद, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले आहे. मुंबईच्या लोकांना माहित नसते दुधाची म्हैस घेताना कास मोठे बघून चालत नाही. मोठ्या कासेचे म्हैस घेतल्यावर त्याला दूध निघत नाही. हे म्हैस घेतल्यावर कळतं. तसं जयंत पाटील यांचा कास मोठा आहे, पण दुधाला नाही.. त्यांच्या नेता पण तसाच आहे,त्याच्यावर बोलु नका म्हणून मला सूचना आहे.. असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. ते सांगलीच्या संजय नगर मध्ये पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये बोलत होते.

दिल्ली घटनेचे नांदेडमध्ये पडसाद

दिल्लीत आज 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता. पोलिसांनी मोर्चाला रोखल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटले आहेत. दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी कडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. सरकार पोलिसांना पुढे करून दडपशाही करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी

मंत्रालयीन प्रवेशासाठी सरकारने आता ऑनलाईन प्रवेश प्रणाली सुरू केली असून डिजी प्रवेश पास असल्याशिवाय मंत्रालयात एंट्री मिळणार नाही.

स्नेहा झंडगे आत्महत्या प्रकरण; आरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

स्नेहा यांचे पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासु विठाबाई झंडगे, सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांना पोलिसांनी अटक केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून स्नेहाने शनिवारी रात्री आत्महत्या केली होती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्नेहा यांच्या सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी

बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात मागील चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला असून सिंदखेड राजा तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला तर देऊळगाव राजा तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेताला तलावाचे स्वरूप आले असून शेतातील पिकही पाण्याखाली गेली आहेत .

कोकण म्हाडा लॉटरीची मुदतवाढ

म्हाडा, किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने, जुलै मध्ये गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. यावेळी, कोकण बोर्ड एकूण ५,२८५ फ्लॅट्स आणि ७७ निवासी भूखंड विक्रीसाठी देत आहे. आज कोकण म्हाडा मुदत वाढ 26 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे.

इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले, पैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसाने इसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, धरण प्रशासनाने आज ईसापुर धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात केली असून यासाठी ईसापुर धरणाचे तीन गेट 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत या गेटमधून पैनगंगा नदी पात्रात 1975 क्विसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे दरम्यान नदीकाठच्या गावकऱ्यांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून गावकऱ्यांनी नदीच्या परिसरात प्रवेश टाळावा तसेच स्वतः सह जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Parbhani Accident:  भरधाव कार कावड यात्रेत घुसली दोन जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

भरधाव कार कावड यात्रेत घुसल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले आहेत तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पाथरी तालुक्यातील खेडुळा पाटी येथे घडला. ऋषिकेश शिंदे, एखणात गजमल असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. यात्रा पाथरी येथून सेलूकडे जात असताना भरधाव कार यात्रेत घुसली.

रायगडमधील ध्वजारोहण आदित्य तटकरेंच्या हस्ते होणार

स्वांतत्र्यदिनी करण्यात येणाऱ्या ध्वजारोहणाच्या मुद्द्यावरून महायुतीत वाद सुरू होता. त्या वादावर आता पडदा पडलाय. रायगड आणि नाशिकमध्ये कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार यावरून महायुतीत वाद होता. आता या वादाचा निकाल लागलाय. रायगड येथे १५ ऑगस्टला आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

महाराष्ट्र सरकारमधील कलंकित मंत्र्याची हकालपट्टी करा; ठाकरे गटाकडून जन आक्रोश आंदोलन

महाराष्ट्र सरकार मधील महायुतीच्या कलंकीत आणि भ्रष्ट मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा,यावी या मागणीसाठी आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अंधारे चौकात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

कोकण रेल्वेची रोरो आता कणकवलीतील नांदगाव स्थानकात थांबणार

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. यावर्षी पासून कोलाड ते गोव्यापर्यंत सुरू करण्यात आलेल्या कार रोरो सेवेला आता कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्थानकात ही गाडी थांबणार आहे.. यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जाणाऱ्यांन याचा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे कोकणात जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या ५० गाड्या यावर्षी वाढवण्यात आल्या आहेत.

पुण्यातील शिवसृष्टी 31 ऑक्टोबरपर्यंत सवलतीच्या दरात पाहता येणार

पुण्यातील शिवसृष्टीचे कामाचे बजेट ४३८ कोटीचे आहे. शिवसृष्टी काम चार टप्प्यात होणार आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत पुण्यातील चार टप्प्यातील शिवसृष्टी काम पूर्ण होणार आहे. पुढील 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांना फक्त 75 rरुपयात शिवसृष्टी पाहत येणार आहे.

देशात दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या - उद्धव ठाकरे

सराकारने स्वत:च्या हाताने लोकशाहीला काळीमा फासलाय - उद्धव ठाकरे.

सरकारला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलो - उद्धव ठाकरे.

सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग मोठं आहे का? - उद्धव ठाकरे.

देशात दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या - उद्धव ठाकरे.

राहुल गांधींनी मतचोरी झाल्याचं दाखवलं - उद्धव ठाकरे.

मतांची चोरी लपवण्यासाठी सरकारचा आटापिटा - उद्धव ठाकरे.

शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा

- शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा

- अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर दोन गट आपापसात भिडले

- शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप

- दोन गट आपापसात भिडल्यानं उडाला गोंधळ

- पोलिसांसह उपस्थित सुरक्षा रक्षकांनी सोडवलं भांडण

- एकमेकांची कॉलर पकडत केली शिवीगाळ

पुण्यातील शिवसृष्टी 31 ऑक्टोबर पर्यंत सवलतीच्या दारात पाहता येणार

पुण्यातील शिवसृष्टी 31 ऑक्टोबर पर्यंत सवलतीच्या दारात पाहता येणार

लहान मुलांना मनोरंजन साठी काही करतोय पण काही प्रकल्प असे आहेत की तिकडे शांतता आहे ते पाहता येत नाहीत पालकांना आमची विनंती

पुण्यातील शिवसृष्टीचे कामाचे बजेट ४३८ कोटीचे आहेत

ही शिवसृष्टी चार टप्प्यात काम होणे

डिसेंबर २०२७ पर्यंत पुण्यातील चार टप्प्यातील शिवसृष्टी काम पूर्ण होणार

अजून दोन टप्पे राहिले आहेत त्याला ३०० कोटी रुपये खर्च लागणार आहे

लहान मुलं दंगा मस्ती करतात त्यामुळे ज्या लोकांना सिरीयसली पाहायचं आहे त्यांना पाहता येत नसल्याचे कारण देत त्यांना अणू नये अशी विनंती जगदीश कदम यांनी केलीय..

तर यापूर्वी प्रौढ लोकांना 600 तर अल्पवयीन मुलांना 300 रुपये शुल्क घेतलं जात होत मात्र आता 31 ऑक्टोबरपर्यंत शिवसृष्टी सवलतीच्या दारात पाहत येणार आहे

अभय भुतडा फॉउंडेशनतर्फे 75 लाखांची देणगी देण्यात आलीय...

पुढील 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांना फक्त 75 rरुपयात शिवसृष्टी पाहत येणार आहे

अशी माहिती महाराजा छत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिलीय.

15 ऑगस्ट ते 15 मे दरम्यान दीड लाख शिवप्रेमींनी शिवसृष्टीला भेट दिली असल्याची देखील त्यांनी माहिती दिलीय.

ठाण्यातील तलावात १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील कासारवडवली येथिल तलावात घडला आहे. सदरचा मुलगा परिसरातील जुम्मा नगर या ठिकाणी राहत होता. सदरचा मुलगा पोहण्यासाठी गेला होता. या प्रकरणाचा पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत.

नांदेडमध्ये ठाकरे शिवसेनेचे सरकारचे विरोधात आंदोलन

नांदेडमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शहरातील आयटीआय चौकात ठाकरे शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक पत्त्याचा डाव मांडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संजय शिरसाट, मंत्री योगेश कदम त्यांच्या इतर मंत्र्यांच्या विरोध हे आंदोलन होते. सरकारमधील वादग्रस्त मंत्राची हाकलपट्टी करण्यात यावी अन्यथा ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.

जेजुरीत पाच मजली इमारत झुकली

जेजुरीत पाच मजली इमारत झुकली – परिसरात तात्काळ खबरदारी. भरवस्तीतील सकाळी ही पाच मजली इमारत आली पाडण्यात आली.सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.जेजुरी शहरातील खोमणे आळीतील बांधकामाधीन इमारत काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धोकादायकरीत्या झुकली होती .जेजुरी नगरपरिषदने अग्निशमन दल व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली.पोलिसांची तातडीची घटनास्थळी घाव घेवून रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले. सुरक्षा बरिकेट लावून रहदारी थांबविण्यात आली.जेजुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळी परिसरात काल सायंकाळी अंदाजे 5 वाजता बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत अचानक एका बाजूला धोकादायकरीत्या झुकल्याने परिसरात खळबळ उडाली.वेळीच घेतलेल्या उपाययोजनांमुळे संभाव्य अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व नगर परिषदेचे आधिकरी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारती भोवतालचा परिसर तात्काळ बंद करण्यात आला तसेच शेजारील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.पहाटे पुणे महानगर पालिकेचे कटर्स दाखल झाले .सकाळी आठ वाजता इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आणि क्षणार्धात पाच मजली इमारत खाली कोसळली.

नाशिकमध्ये बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी येथे दिवसा ढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी रोख रकमेसह सोन चोरुन नेल्याची घटना उघडीस आली आहे.नामदेव वेद शिरसाठ हे काल रक्षा बांधनासाठी गावी गेले होते,गावाहून परत आले असता घराचे कुलूप तुटलेले दिसले,दरवाजा उघडून घरात गेले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी पोलिसाना याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहचताच त्यांनी पाहणी करत पंचनामा केला यात 2 लाख 20 हजाराची रोख रक्कम व तीन तोळे सोने असा लाखोंचा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आले अडून पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.

वसईतील विहिरीत १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

वसईच्या धुमाळ नगरातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवताना पती विहिरीत पडल्या

नाशिकच्या मालेगाव येथील नामपूर रस्त्यावर यश गार्डनच्या पाठीमागे असलेल्या विहिरीवर पाणी भरत असतांना पूजा कैलास वाघ ही २५ वर्षीय महिला तोल गेल्याने १०० फुट खोल विहिरीत पडली असता आजू-बाजूच्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट लक्षात येताच पती कैलास वाघ याने पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली या दोघांना वाचविण्यासाठी गावक-यांनी खाट टाकत वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत दोघांना वरती काढत त्यांना तातडीने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,सुदैवाने दोघांचे यातून सुखरुप वाचले केवळ हातापायाला जखमा झाल्या असून या दोघांची तब्बेत चांगली असल्याच सांगण्यात आले.

भाजप नेत्याची विरोधी पक्षाच्या आंदोलनावर टीका

भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांची निवडणूक आयोगाविरोधातच्या विरोधी पक्षाच्या आंदोलनावर टीका

राहुल गांधी सह सर्व विरोधी पक्षांची नौटंकी सुरू आहे

जनतेमध्ये जनाधार मिळत नाही म्हणून विरोधी पक्ष झोपेचा सोंग घेत आहेत आणि निवडणूक आयोगाला संशयाच्या भवऱ्यात उभे करत आहेत असा गेम प्लॅन आहे

निवडणूक आयोगाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा

राज्यातील विवीध प्रश्नांबाबत शिवसेना ठाकरे गटाने आज जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य सरकारच्या कारभारावर तिव्रशब्दात भावना व्यक्त करीत मोर्चेकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. मंत्र्यांचे फोटो मोर्चामध्ये लावण्यात आलेले होते मोर्चामध्ये सरकारची प्रेतयात्रा काढण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चा सांगण्यात करण्यात आले

Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिर वादात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उडी

होय मी हिंदू आहे म्हणत जितेंद्र आव्हाड यांची तुळजाभवानी मंदिर वाचूया ही साद

आई भवानीची शपथ मंदिराला हात लावू देणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

मंदिर बचाव कृती समितीच्या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड उद्या तुळजापुरात येणार असल्याची माहिती

तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात शिखर काढण्याला पुजारी मंडळाचा आहे विरोध

तर राज्यपुरातत्व विभागाने शिखर हटवण्याबाबत अहवाल दिल्याची माहिती

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अंतिम अहवालानंतर तुळजाभवानी मंदिर शिखराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय होणार

Raigad: रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा

राज्यातील विवीध प्रश्नांबाबत शिवसेना ठाकरे गटाने आज रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या जन आक्रोश मोर्चात सामिल झालेल्या शिवसैनिकांनी आक्रमक होत पोलिसांनी लावलेले बॅरिगेट तोडत थेट रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाला धडक दिली. राज्य सरकारच्या कारभारावर तिव्रशब्दात भावना व्यक्त करीत मोर्चेकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

जगदीप धनखड यांचे कॅमेरामॅनही गायब- प्रियंका चतुर्वेदी

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे कॅमेरामन ही गायब आहेत. आवाज दाबण्याचे काम भाजपकडून महाराष्ट्रात झाले आहे. आमची मतं चोरीला गेले आहेत याबाबत जनता विचारणा करत आहे त्याचे उत्तर भाजप देत नाही, असे चतुर्वेदी म्हणाल्या..

क्रीडा मंत्री नव्हे, रमी मंत्री आहेत- उद्धव ठाकरे

क्रीडा मंत्री नव्हे, रमी मंत्री आहेत. सभागृहात रमी खेळतात, यांना काही वाटत नाही का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी माणिकराव कोकाटे यांना लगावला. भ्रष्ट्राचारी मंत्री जात नाहीत, तोपर्यंत लढा, आंदोलन सुरूच राहणार आहे. हे सरकार जनतामुख नव्हे गिळमुख आहे, असे ठाकरे म्हणाले. उपराष्ट्रपती जगदीप धडखड कुठे आहेत? तुम्ही त्यांचे ऑपरेशन केलेय काय? असा सवाल ठाकरेंनी केला.

गद्दारांना डोके आहेच कुठे, त्यांच्याकडे फक्त खोके - उद्धव ठाकरे

भ्रष्ट्राचाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. गद्दारांना डोके आहेच कुठे, त्यांच्याकडे फक्त खोके आहे. सरकारमध्ये सर्वच मुखवटे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

खोट्या नोटा, पत्त्यांचे डाव, पुण्यात सरकार विरोधात शिवसेनेचे आंदोलन

पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी राज्य सरकार मधील मंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटो घेऊन होम हवन केलं. यावेळी शिवसैनिकांनी खोट्या नोटा घेऊन येत थेट पत्त्यांचे डाव मांडत राज्यातील मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. काही जणांनी तर थेट शर्ट काढून आंदोलनात सहभाग घेतला तर काही जणं थेट भरत गोगावले यांच्या सारखी वेशभूषा करून प्रतिकात्मक होम हवन केलं.

प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतलं 

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज जवळपास ३०० खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले आहे.

Politics: सरकार मधील मंत्र्यांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन

महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्रान विरोधात ठाकरे गटाने राज्यभरात आंदोलनाचे हाक दिली आहे . या पार्श्वभूमीवर आज डोंबिवलीत ठाकरे गटाने अनोखी आंदोलन करत महायुती सरकारमधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनात बनियन आणि लुंगी वर बॉक्सिंग खेळत तसेच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात आंदोलन करत जोडीदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला . बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात कारवाई करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आला.

निवडणूक आयोगाविरोधात ३०० खासदार एकवटले; इंडिया आघाडीचं आंदोलन

आज लोकसभेत इंडिया आघाडीचं आंदोलन सुरु आहे. निवडणूक आयोगाविरोधात ३०० खासदार एकत्र येऊन आंदोलन करत आहेत.

Nandurbar: नंदुरबारमध्ये खोदकाम झालेल्या खदानित साचलेल्या पाण्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू....

पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एका मित्राचा गेला जीव

सणासुदीच्या दिवशी परिवारावर शोककळा

मुलांना पाण्यात बुडताना पाहून मेंढपाळ महिला धावली

मेंढपाळ महिलेच्या सतर्कतेने दुसऱ्या मुलाचा वाचला जीव

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात घडली दुर्देवी घटना

संदीप नायका नामक सतरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ

Washim: वाशिममध्ये दुकानासमोरून अवघ्या 35 सेकंदात दुचाकी चोरट्यांनी केली लंपास...

वाशिमच्या डोंगरकीन्ही गावात एका कृषि केंद्रासमोर उभी असलेली दुचाकी दोन चोरट्यानी अवघ्या 35 सेकंदात लंपास केली. दोन चोरटे आले आणि दुचाकीच हँडल लॉक तोडलं आणि काही लक्षात येण्याच्या आत दुचाकी लंपास केली. हि चोरीचा घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून,या सैराईत दुचाकी चोरट्याचा आता पोलीस कसा शोध घेतात हे पहावं लागेल.

महादेवी हत्तीणी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार

महादेवी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आले. त्यानंतर कोल्हापूरातील नांदणी गावकऱ्यांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणी आता गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Amravati: अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे असलेल्या फिनले मिलमध्ये कामगारांची वेतन थकले

कामगारांच मिल मधील चिमणीवर चढून शोले आंदोलन;शोले आंदोलनाचा आजचा तबल पाचवा दिवस...

दोन अडीच महिन्यांपूर्वीही दोन कर्मचाऱ्यांनी चिमणीवर चढून केले होते आंदोलन

मिलच्या प्रशासनाने बैठक घेऊन बोनस आणि वेतन देण्याचं दिलं होतं आश्वासन..

मात्र बैठकीमध्ये प्रशासकीय कोणी हजर राहत नसल्याने कामगार त्रस्त..

गेल्या तीन महिन्यापासून कामगारांचे वेतन थकले,

वेतन आणि बोनसची मागणी घेऊन कामगार पुन्हा एकदा मिल मधील चिमणीवर चढून आंदोलन सुरू केलं..

Shravan: तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त औंढा नागनाथ मंदिर शिवभक्तांच्या गर्दीने दुमदुमले

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मध्ये शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती, औंढा नागनाथ बसस्थानकपासून ते मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळालं तर मंदिर परिसरात शिवभक्तांनी बम बम भोलेचा गजर करत प्रभू शिवशंकराला दुग्धाभिषेक केला या वेळी प्रशासनाच्या वतीने चोख अशी व्यवस्था ठेवण्यात आली. होती

Jalna: जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील गुंज येथील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्याचे जलसमाधी आंदोलन

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक येथील गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन सुरू केल आहे. 2024 मधील वाढीव पीकविमा अनुदानाच्या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीचे घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक येथील गोदावरी नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आल आहे. 2024 मधील पीक विम्याची वाढीव रक्कम सरकारने तात्काळ द्यावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहे..

Thane: घोडबंदरच्या वाहतूक कोंडीमुळे महिलेचा ॲम्बुलन्स मध्ये मृत्यू

ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार वसई ते घोडबंदर पर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे पालघर तालुक्यातील सफाळे, मधुकर नगर येथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव यांचा दूदैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. छाया पुरव ह्या मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे राहत होत्या मात्र त्या सुट्टीनिमित्त त्यांच्या मूळ गावी सफाळे मधुकर नगर येथे आल्या होत्या. मात्र जिल्हा परिषद शाळा आणि घराच्या शेजारी झाडाच्या फांद्या कापण्याचं काम सुरू असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना सुरुवातीला पालघर येथे उपचारासाठी नेण्यात आले मात्र प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात नेत असताना मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडे जायला खूप उशीर होत होता. परिणामी छाया गुरव यांची प्रकृती गंभीर झाली .त्यांना मिरा रोड येथील ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यामुळे छाया पुरव यांचा मृत्यू रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय.

सोयाबीन आणि कपाशीवर मोठ्या प्रमाणावर विविध रस शोषक अळ्यांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव

राज्यामध्ये अनेक भागांमध्ये सुरुवातीला पावसाने मोठा खंड दिला त्यानंतर सर्वत्र जोरदार पाऊस झाला यामुळे सध्या राज्यातील सोयाबीन आणि कपाशीवर मोठ्या प्रमाणावर विविध रस शोषक अळ्यांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झालाय यामुळे शेतकरी हैराण झाले असून नेमका हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे यासंदर्भामध्ये परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत नेमक्या काय या उपाययोजना आहेत हे पाहूयात

स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाने कुणाच्या मनाप्रमाणे नाही तर पाठीचा कणा असल्याप्रमाणे निष्पक्ष राहणं अपेक्षित आहे, पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल जी गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा जाहीर पंचनामा केला. तरीही आयोग मात्र धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असल्याचा आव आणत उलट राहुल जी गांधी यांच्याकडंच शपथपत्राची मागणी करतोय. हे म्हणजे, ‘गिरे तो भी टांग उपर’, असला प्रकार आहे आणि आता तर वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यास बांधिल नसल्याचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात देऊन निवडणूक आयोग नेमकं काय लपवत आहे? आणि कुणासाठी लपवत आहे?
रोहित पवार
महादेवी हत्तीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. राज्य सरकार याबाबत आपली बाजू आज कोर्टात मांडणार आहे. महादेवी परत नांदणी मठातील असा विश्वास आहे जर ती आली नाही तर पुढील आंदोलन मोठ्या स्वरूपाचा असेल
राजू शेट्टी

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते जिल्ह्यातील ३०० कीर्तनकारांचा सन्मान

लोकांच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या वागणुकीचा संदेश देत असतात.. हा उपदेश करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःच् प्राप्त केला आहे .. त्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कीर्तनकारांचा सत्काराचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.. या कार्यक्रमाचे आयोजन सचिन जाधव मित्र मंडळाने केले होते .. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील ३०० नामवंत कीर्तनकारांचा सन्मान मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला .. यावेळी शेकडो कीर्तनकार तसेच ग्रामीण भागातून आलेले वारकरी संप्रदायाचे नागरिक उपस्थित होते.. आलेल्या सर्व वारकरी आणि कीर्तनकार मंडळींना यावेळी पुरण पोळीचे जेवण देखील या मित्र मंडळाने दिलेय..

कोकणातील कातळसडे रानफुलांनी बहरले

पावसाळ्यात कोकणाचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून जाते यातच रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ सडे रानफुलांनी बहरून गेले आहेत. जिल्ह्यातील सापुचेतळे भागातील कातळ सड्यांवर तिरड्याची रानफुले, कारवी, टोपली कारवी, निळपुष्पी, सडसडी, सोनकी, जांभळीपुष्पी, सोनतळ आधी रानफुलांनी कातळसड्यांवर रंगबेरंगी पांघरून घातल्याचा आभास होतो. श्रावण मासात विविध सणांमध्ये या रानफुलांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक रानफुले औषधी देखील आहेत.

संसदेच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त.  संसदेत जाणाऱ्या गेटवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बॅरीगेटींग.   परिवहन भवन कार्यालयाच्या पुढे सामान्यांना जाण्यासाठी परवानगी नाही

साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशाला सातारा पोलीस प्रशासनाकडून केराची टोपली...

सातारा शहरांमध्ये गणेश मिरवणुकी दरम्यान डॉल्बी वाजणार का ? या प्रश्नावर दोन दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नंतर पडदा पडला होता. त्यानंतर काल रात्री सातारा शहरातील गणेश मंडळानी गणेश मूर्ती आगमनाच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम देखील लावली. दहा वाजायच्या आत ही मिरवणूक मंडळाकडून संपवण्यात आली परंतु नंतर सातारा पोलिसांकडून या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला असून लावण्यात आलेली साऊंड सिस्टिम देखील पोलिसांनी जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अखेर गणेश उत्सवा दरम्यान आता नेमक ऐकायचं कुणाचं पालकमंत्र्यांचं की पोलीस प्रशासनाचा असा प्रश्न साताऱ्यातील गणेश उत्सव मंडळांना पडला आहे.

अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर अमरावती पोलिसांची कारवाई; एम.डी., गांजा, विदेशी मद्य ही जप्त

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अमरावती शहरातील रायली प्लॉट येथील अवैध हुक्का पार्लरवर धाड टाकून २,८७,४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एम.डी. (मॅफेडॉन) अंमली पदार्थ, गांजा, विदेशी दारू, हुक्का सेवन साहित्य आणि मोबाईल यांचा समावेश आहे.पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या आदेशानुसार पीआय संदीप चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रमेन्द्र ओमप्रकाश शर्मा (५५) याने आपल्या घराच्या टेरेसवर ‘काफिला’ नावाचा हुक्का पार्लर चालवत असल्याचे समोर आले. तेथे विदेशी दारू विक्री व अंमली पदार्थांचे सेवनही होत असल्याची खात्री पटल्यावर पथकाने धाड टाकली.

या वेळी पथकाला प्रतिकार करत आरोपींनी हुज्जतबाजी, झटापट केली आणि काही ग्राहकांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एकूण ११ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २५ ग्रॅम गांजा, ३ ग्रॅम एम.डी., विविध हुक्का साहित्य, नगदी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.

तुळजापूर तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

धाराशिव- तुळजापूर तालुक्यामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच पक्षप्रवेश देण्यासाठी चढाओढ लागली आहे.तुळजापूर तालुक्यातील भाजपमध्ये असलेल्या काही सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनकडुन बांधणी केली जात आहे.

- सार्वजनिक गणेश मंडळांना यंदा नागपूर महानगरपालिकेला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही

- महानगरपालिकेने स्वच्छता आणि संपदा शुल्कावरील सूट कायम ठेवली

- या सवलती बरोबरच मनपाने रविवारी परवानगी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले

- पहिल्याच दिवशी पाच झोन मधून बारा अर्ज प्राप्त झाले

- आधी मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी 250 रुपये तर स्वच्छता आणि संपदा विभागासाठी एक हजार रुपये शुल्क आकारात होती

- मंडळांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवणार नाही असे शपथ पत्र सादर करावे लागणार

अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वलगाव,नांदगाव पेठ,भातकुली,पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्त्यात कपात

अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येत असलेल्या वलगाव नांदगाव पेठ,भातकुली या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या घर भाडे भत्त्यात कपात करण्यात आली आहे. जवळपास एका अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्याच्या घर भाडे भत्त्यात साडेचार हजार ते पाच हजार रुपयाची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या इतर पोलीस स्टेशन प्रमाणे या तीनही पोलिसांना घरभाडे भत्ता सारखा असावा अशी मागणी पोलीस पत्नींनी केली आहे... सोबतच वलगाव,नांदगाव पेठ,भातकुली या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये घर भाडे भत्ता कमी असल्यामुळे व इतर सुख सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी बदली झालेले अधिकारी, कर्मचारी वलगाव, नांदगाव पेठ ,भातकुली या तिन्ही पोलीस स्टेशनमधील रुजू होण्यास टाळाटाळ करत करतात.. त्यामुळे यामध्ये तोडगा काढण्यासाठी पोलीस पत्नीने थेट गृहमंत्र्यांनाच त्याबाबत विनंती केली आहे..

जालन्यातील अंबड तहसीलदारांची वाळू माफियांवर कारवाई

जालन्यातील अंबडच्या तहसीलदारांनी मागील वर्षभरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 26 वाळूमाफियांच्या मालमत्तेवर तब्बल 7 कोटी 52 लाखांचा बोजा चढविला आहे. अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर वर्षभरात महसूल प्रशासनाने वेळोवेळी कडक कारवाई करत 1 ऑगस्ट 2024 ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये 26 वाळूमाफियांवर विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या मालमत्तेवर 7 कोटी 52 लाख रुपयांचा बोजा महसूल प्रशासनाने चढवला आहे त्यामुळे अंबड तालुक्यातील वाळू माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने रात्रगस्त सुरु असून यापुढे कोणी अवैध वाळू उपसा करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अंबडच्या तहसीलदारांनी दिला आहे..

Maharashtra Live News Update: इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदारांचा होणार मोर्चा

संसद भवन ते निवडणूक आयोग असा एक किलोमीटर मोर्चाचा मार्ग

महाराष्ट्र, कर्नाटक मधील मतदार याद्यातील घोळ समोर आणल्यानंतर राहुल गांधी यांनी केली मोर्चाची घोषणा

बिहार मधील मतदार यादी सुधारणा (SIR) ला देखील आघाडीचा विरोध

जाणीवपूर्वक अनेकांची नाव यादीतून वगळली जात असल्याचा आरोप

खोक्या भोसलेची जेलमध्येही दहशत; गांजा वाटून घेण्याच्या कारणावरुन इतर कैद्यांसोबत भांडण

बीड जिल्हा कारागृहातील बॅरेक नंबर चारमध्ये असलेल्या चार कैद्यांमध्ये गांजा वाटून घेण्यावरुन वाद झाला... हा वाद ऐकून तिकडे गेलेल्या कर्मचार्‍यावरच या चार कैद्यांनी धावून जात शिवीगाळ केली.. तसेच बाहेर सुटल्यावर तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली... गंभीर बाब म्हणजे यात खोक्या भोसलेचा देखील समोवश आहे.. खोक्या भोसले हा चार गुन्ह्यांमध्ये सध्या कारागृहात असून त्याच्यासह शाम पवार, वसीम पठाण, यमराज राठोड या तिघांमध्ये हा वाद झाला... आता या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय मोरे हे करत आहेत..

दादरमधील कबुतर खान्यावर पुन्हा ताडपत्र टाकण्यात आली

रात्रीतून मुंबई महापालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्याचं काम करण्यात आलेय

तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

Maharashtra Live News Update: पुण्यात बांधकाम प्रकल्पांचे नामफलक आता मराठीतच, महापालिका आयुक्तांचा आदेश

मान्यता प्राप्त निवासी आणि व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांचे नामफलक मराठीत लिहिण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहेत. याबाबत मनसे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार प्राप्त रेखांकन आणि बांधकाम प्रस्तावांना पुणे महापालिकेमार्फत परवानगी देण्यात येते.

त्यानंतर विकसकामार्फत मान्य बांधकाम परवानगी नुसार प्रत्यक्ष जागेवर काम करण्यात येते. विकसकांमार्फत होत असलेल्या विविध निवासी आणि अनिवासी इमारत विकास प्रकल्पांचे नामफलक मराठी भाषेत ठळक अक्षरात दर्शनी भागात दर्शवणे या कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून अनिवार्य करण्यात येत आहे,असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

खडकवासला धरण साखळीत 88.47 टक्के पाणीसाठा

महिन्याच्या पहिल्या ४ दिवस पावसाची चांगली नोंद मात्र पाच ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने मारली दडी

खडकवासला धरणक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गेले दीड महिन्यात मुळा-मुठा नदीत करण्यात आला आहे.

खडकवासला,पानशेत,वरसगाव व टेमघर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा

खडकवासला 1.12 टीएमसी

पानशेत 9.57 टीएमसी

वरसगाव 11.58 टीएमसी

टेमघर 3.49 टीएमसी

एकूण पाणीसाठा 25.79 टीएमसी म्हणजे 88.47 टक्के पाणीसाठा उपलब्ध

गेल्या वर्षी याच वेळी 27.73 टीएमसी म्हणजे 95.12 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

ऊस द्राक्षाच्या पट्टयात कडधान्याचा पेरा सर्वाधिक दोन हजार 400 एकरांवर उडीदाची पेरणी

ऊस द्राक्ष, डाळिंब आणि केळी उत्पादनासाठी आग्रेसर असलेल्या पंढरपूर तालुक्यात तब्बल 20 वर्षांनंतर कडधान्यांचा पेरा वाढला आहे. यंदाच्या खरिप हंगामात उडीद,तूर,मूग या कडधान्यासह सूर्यफूल भुईमूग या तेलबियांची सुमारे पाच हजार एकरावर लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दोन हजार चारशे एकरावर उडीद पिकाची लागवड केली आहे. ही लागवड प्रामुख्याने द्राक्ष डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या तालुक्यातील कासेगाव,करकंब चळे या भागात सर्वाधिक झाली आहे.

बदलत्या हवामानामुळे द्राक्ष डाळिंब बागांवर वाढलेला किडीचा प्रादुर्भाव आणि बाजारातील दराची अनिश्चिती यामुळे फळबाग शेती संकटात आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांचा कडधान्य लागवडी कल वाढला आहे.

दरोड्यातील दोन आरोपींना परभणीतून अटक

यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावर वाजता व्यावसायिकांच्या मालवाहू वाहनावर हल्ला करून त्याला लुटण्यात आले या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी दोघांना अटक केली.मात्र इतर चार आरोपी पसार झाले होते, हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले आरोपीचा शोध घेत असताना एलसीबीच्या पुसद पथकाने सापळा रचून वडद जिल्हा परभणी इथून दोघांना अटक केलीये. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. नामदेव चव्हाण आणि संतोष चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

CM Devendra fadnavis latur visit मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या दरम्यान लातूरमध्ये शेतकरी नेते नजर कैदेत.

. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना , नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलाय, सोयाबीनला 6 हजार प्रतिक्विंटल भाव द्या यासह इतर मागण्या घेऊन , 2013 साली स्वतः देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि पाशा पटेल यांनी पायी दिंडी काढली होती, मात्र आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत आणि मंत्रिमंडळात पंकजा मुंडे देखील आहेत, मात्र सोयाबीनला सहा हजार भाव का मिळत नाही , या प्रश्नांची उत्तर विचारण्यासाठी, हे शेतकरी संघटनेचे नेते आज शहरात पायी दिंडी काढत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते,मात्र त्यापूर्वीच या शेतकरी नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे आहे.

कोकणातील कातळसडे रानफुलांनी बहरले

पावसाळ्यात कोकणाचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून जाते यातच रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ सडे रानफुलांनी बहरून गेले आहेत. जिल्ह्यातील सापुचेतळे भागातील कातळ सड्यांवर तिरड्याची रानफुले, कारवी, टोपली कारवी, निळपुष्पी, सडसडी, सोनकी, जांभळीपुष्पी, सोनतळ आधी रानफुलांनी कातळसड्यांवर रंगबेरंगी पांघरून घातल्याचा आभास होतो. श्रावण मासात विविध सणांमध्ये या रानफुलांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक रानफुले औषधी देखील आहेत.

Maharashtra Live News Update: सिडकोच्या घरांची लॉटरी लांबणीवरच

सिडकोच्या घरांची लॉटरी आता लांबणीवरच

सिडको कडून 15 ऑगस्ट रोजी जम्बो लॉटरी करण्याचा प्लॅन होता

मात्र नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सिडकोच्या घरांच्या किमती करण्याबाबत अजूनही बैठक झाली नसल्यामुळे

त्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडणार आहे

पावसाळी अधिवेशनामध्ये घरांच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक घेतली जाईल असा आश्वासन मंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलं होतं

मात्र सिडकोच्या घरांची किमती करण्यासंदर्भामध्ये कोणताही निर्णय अजून घेतला जात नाहीये

त्यामुळे सोडत धारक सुद्धा अडचणीत सापडले आहेत

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश समिती आक्रमक

मुंबई- गोवा महामार्ग गेले अनेक वर्षांपासून रखडलेला आहे.. अनेक वेळा आंदोलने करण्यात आले. मात्र रस्त्याचे काम काही पूर्ण झाले नाही..अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अखेर या संदर्भात आता मुंबई गोवा जनआक्रोश समिती ही आक्रमक झाली असून आंदोलन पुकारलेले आहे..

दरम्यान या आंदोलनचा भाग म्हणून पनवेल येथील पळस्पे येथे पाटपूजन कार्यक्रम पार पडला.. यावेळी मोठ्या संख्येने कोकणर नागरिक उपस्थित होते.. तर सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.तर पुढचा आंदोलन हे पेण मध्ये होणार असून, पुन्हा लांजा ते मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील बंगल्या पर्यंत हे आंदोलन असणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणाऱ्या त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचे येणार अच्छे दिन; तीन ग्रहांमुळे मिळणार

Mental Health : रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम

Karuna Munde : धनंजय मुंडेंचे मुंबईत ३ फ्लॅट, पण मुक्काम मात्र सरकारी बंगल्यावर, करूणा मुंडे अन् अंजली दमानियांचा गंभीर आरोप

ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, महायुतीत नेमकं काय सुरू?

SCROLL FOR NEXT