चीनमध्ये थैमान घालत असलेला HMPV व्हायरस चा भारतात दाखल झाला आहे. देशात त्याचे काही रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान पुण्यातील लोहगाव विमानतळावर ज्या ठिकाणी देशातून आणि विदेशातून अनेक नागरिक ये जा करत असतात, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नसल्याचं समोर आलं आहे.
या व्हायरसविरूद्ध पुणे महानगरपालिका सतर्क असून पुणे महानगरपालिकेने 50 बेडचे विलगीकरण कक्ष तयार केला आहे. मात्र पुणे विमानतळ प्रशासनाला अजून कुठलेही अलर्ट आलं नसल्याने या ठिकाणी तपासणी होत नाही. पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाची बैठक झाली. मात्र लोहगाव विमानतळावर प्रवाशाची तपासणी सुरू केलेली नाही. याबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल अस महापालिका अधिकारी यांनी सांगितलं आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोरोडे यांनी सांगितलं की, विमानतळावर अद्याप महापालिकेनं स्क्रीनिंग किंवा तपासणी सुरु केलेली नाही. राज्य सरकारच्या सुचनेनुसार विमानतळावर स्क्रीनिंग सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाची लागण लहान मुलांना सहज होत नव्हती मात्र या विषाणूची लागण लहान मुलांनाही होताना दिसते. हा विषाणू २००१ मध्येच नेदरलँडमध्ये आढळून आला होता.
डॉ. बोरोडे पुढे म्हणाल्या की, हा साधा विषाणू आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. या व्हायरसचं इन्फेक्शन जरी झालं तरी ॲडमिट होण्याची गरज भासत नाही. महापालिकेने नायडू संसर्गजन्य रुग्णालय आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयात ३५० बेड तयार ठेवले आहेत. या सर्व बेडना व्हेंटीलेटर सुविधा उपलब्ध आहे.
डॉ. बोरोडे यांच्या सांगण्यानुसार, मुळात या व्हायरसवरची उपचार पद्धती माहिती आहे. इतर व्हायरस प्रमाणे हा व्हायरस असून तो कोरोनासारखा नाही. हा व्हायरस श्वसन संथेच्या वरच्या भागाला इजा करतो. लहान मुलं आणि ज्येष्ठांमध्ये हा व्हायरस जास्त प्रमाणात आढळू शकतो. हा व्हायरस त्यांच्या फुफुसपर्यंत जाऊ शकतो. मात्र बाकी वयोगटातील नागरिकांमध्ये श्वसन संस्थेच्या वरचा भागात इन्फेक्शन होतं. मात्र नागरिकांनी घाबरू नये सावध राहिलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.