Air India aircraft grounded for inspection after wingtip contact with an IndiGo plane at Mumbai airport. 
मुंबई/पुणे

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

Air India and IndiGo Aircraft Wings Collide: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अनर्थ होताना टळला. जमिनीवरून हालचाली सुरू असताना एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन विमानांचे पंखांची धडक झालीय.

Bharat Jadhav

  • मुंबई विमानतळावर एअर इंडिया व इंडिगो विमानांच्या पंखांची टक्कर

  • टेक-ऑफपूर्वी टॅक्सीवेवर घडली घटना

  • सर्व प्रवासी सुरक्षित, कोणतीही जीवितहानी नाही

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांचे पंख एकमेकांवर आदळले. टेक-ऑफपूर्वी टॅक्सीवेवर थांबले असताना सर्व्हिस ऑपरेशनदरम्यान एअर इंडियाच्या विमानाच्या विंगटिपचा दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाच्या विंगटिपला हलका स्पर्श झाला. या घटनेत एअर इंडियाच्या विमानाच्या विंगटिपचे नुकसान झाले.

खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विमान तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. या घटनेची माहिती नियामक संस्थेला देण्यात आली असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु विमानाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विमानतळ प्रशासन आणि विमान कंपनीच्या तांत्रिक पथकाने चौकशी सुरू केलीय. एटीसी निर्देशांमध्ये चूक, जमिनीवरील हाताळणीतील त्रुटी किंवा तांत्रिक कारणामुळे ही टक्कर झाली का हे सध्या तपासले जात आहे. इतर विमानांमधून प्रवाशांना पाठवण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

एअर इंडियाने सांगितले की, मुंबईहून कोइम्बतूरला जाणारे विमान (AI2732) टेकऑफपूर्वी टॅक्सीवेवर वाट पाहत असताना दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाशी धडकले. दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांना टक्कर झाली, ज्यामुळे एका पंखाच्या टोकाला नुकसान झाले. खबरदारी म्हणून, पुढील तांत्रिक तपासणीसाठी विमान जमिनीवर ठेवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. आमचे ग्राउंड टीम त्यांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. या घटनेची माहिती नियामकाला देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mothers Day Gifts 2026: फ्लोरल साडीपासून स्टायलिश जॅकेटपर्यंत; आईसाठी खास मदर्स डे गिफ्ट्स

Hair Care: केस पातळ झालेत कपाळ मोठं दिसतयं? मग घरी करा हा सोपा हेअरमास्क केस होतील घनदाट

Thalapathy Vijay : राजकीय वादात नवा ट्विस्ट! थलापती विजय यांचा शपथविधी सोहळा रद्द, धक्कादायक कारण आले समोर

IAS Transfer: बदल्यांचा धडाका! २१ बड्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या, वाचा कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT