असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाने चांगली कामगिरी
ठाणे महापालिकेत ५ उमेदवार निवडून आले आहेत
मुंब्रा येथील नगरसेवकाचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई महापालिका निवडणुकासहित राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाने चांगली कामगिरी केली. ओवैसी यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात एकूण १२६ उमेदवार जिंकले आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मुंब्रा येथील नगरसेविकेची जोरदार चर्चा होत आहे. नवनिर्वाचित नगरसेविकेने थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे. या नगरसेविकेचं विजयानंतरचं भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंब्रामध्ये AIMIM पक्षाकडून जिंकल्यानंतर नगरसेविक सहर युनूस शेख यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे. 'मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू. पुढील महापालिका निवडणुकीत एमआयएमचे नगरसेवक निवडून येतील, असे त्यांनी म्हटलं. सहर शेख यांनी म्हटलं की,'आम्ही त्यांच्या अहंकाराला मातीमोल केलंय. काही जणांना वाटत होतं की, आम्ही केवळ त्यांच्यावर अवलंबून आहोत. पण ते हे विसरले की, आम्ही फक्त आणि फक्त 'अल्लाह'चे मोहताज आहोत. आम्ही कोणाच्या बापाच्या कृपेवर अवलंबून नाही. मुंब्र्याने हे आज सिद्ध करून दाखवलंय'.
महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएम पक्षाने जबरदस्त एन्ट्री मारली आहे. एमआयएम पक्ष आधी तेलंगणा राज्यापर्यंत मर्यादित होता. मात्र, यंदा झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठी मजल मारली आहे. २९ पैकी १२ महानगरपालिकांमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे.
एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक उमेदवार जिंकून आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे सर्वाधिक ३३ उमेदवार निवडून आले आहेत. तर मुंबई महापालिकेत ८ उमेदवार निवडून आले आहेत. तर मालेगाव २१, नांदेड १४, अमरावतीमध्ये १२ उमेदवार जिंकले आहेत. या व्यतिरिक्त धुळे १०, सोलापूर ८, नागपूर 6 उमेदवार निवडून आले आहेत . या व्यतिरिक्त ठाणे, ५, अकोला ३, अहिल्यानगर २ आणि जालन्यामध्ये काही उमेदवार जिंकून आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.