Maval Rose News
Maval Rose News Saam Tv
मुंबई/पुणे

Maval Rose : जगभरातील प्रेमिकांना मावळच्या गुलाबांची भुरळ; ‘व्हॅलेंटाइन डे’ पुर्वी परदेशातून मागणी वाढली

दिलीप कांबळे

Maval Rose News : जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाइन डे काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

ही फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे. या वर्षी व्हॅलेंटाइन डेला मावळातून दहा लाख फुलांची निर्यात होणार आहे.

व्हॅलेंटाइन डेला देश-विदेशातून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मावळातील फूल उत्पादक शेतकरी (Farmer) डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कामाला सुरुवात करतो. सव्वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यात होण्याचा कालावधी असतो.

या वर्षी मावळातील (Maval) गुलाबांच्या निर्यातीला सव्वीस जानेवारीला सुरुवात झाली. या वर्षी पोषक वातावरण असल्याने फुलांच्या उत्पादनवाढीबरोबर दर्जाही उत्तम आहे. औषधांवर नाहक होणारा खर्च पोषक वातावरणामुळे कमी झाला असून, उत्पादन, दर्जा चांगला असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मात्र या वर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे.दरम्यान या वर्षी विमान खर्च जीएसटी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यात नाराजी व्यक्त केली.

फुलांची प्रतवारी देठाच्या लांबीनुसार ठरवली जाते. स्थानिक व जागतिक बाजार पेठेत 40 ते 60 सेंटीमीटर लांबीच्या फुलांना मोठी पसंती असते. या वर्षी मावळातील फुलांना प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत एका फुलाला 20 ते 22 रुपये, तर स्थानिक बाजारपेठेत 15 रुपये भाव मिळत आहे.

व्हॅलेंटाइन डेला मावळातील ‘डच फ्लॉवर’ प्रजातीच्या लाल रंगाच्या गुलाबाची (Rose) देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सर्वाधिक मागणी असते. यावर्षी चांगल्या वातावरणामुळे फुलांचे उत्पादन आणि दर्जा उत्तम असून, फुलांच्या मागणी बरोबर भावही समाधानकारक मिळत आहे.

मात्र यावर्षी विमान खर्च आणि जीएसटी चा जादा खर्च पडल्याने यावर्षी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना भुर्दंड पडला आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या फुलांचा खर्च जास्त असल्याने यावर्षी अनेक देशात फुल निर्यात झाले नसल्याने हा फटका देखील शेतकऱ्यांना बसला असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walk After Meal: जेवणानंतर किती वेळ शतपावली करणं आरोग्यासाठी फायद्याचे?

Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Today's Marathi News Live: जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT