Valentine's Day: काय सांगता! १० कोटी लोकांना कंडोम वाटप; 'या' देशाने घेतला निर्णय

सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी व्हॅलेंटाइन डेपूर्वी 95 दशलक्षाहून अधिक कंडोम देण्याची योजना आखली आहे.
Thailand condom news
Thailand condom newspexels

Valentine Day: फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाइन डे ची चाहुल लागते. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाइन डेचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. प्रत्येकजण आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी, प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी आतुर असतो.

या वॅलेंटाईन वीकसाठी मोठी तयारीही केली जाते. पण सध्या या वॅलेंटाईन वीकसाठी थायलंडने एक चकित करणारा निर्णय घेतला आहे. थायलंड देशामध्ये वॅलेंटाईन वीकमध्ये देशभरात कंडोम वाटप करण्यात येणार आहे. (Valentines Day)

Thailand condom news
Pervez Musharraf : मोठी बातमी! पाकिस्तानचे माझी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

व्हॅलेंटाइन डे निमित्त थायलंड प्रचंड चर्चेत आलंय. थायलंड व्हॅलेंटाइन डे निमित्त देशातील तब्बल 10 करोड लोकांना कंडोम देणार आहे. यामागे किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी, लैंगिक आजारांपासून बचाव, सुरक्षित सेक्स, सामाजिक स्वास्थ्य अशी अनेक कारणं आहेत.

थायलंडने सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि किशोरवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी व्हॅलेंटाइन डेपूर्वी 95 दशलक्षाहून अधिक कंडोम देण्याची योजना आखली आहे. सिफलिस, गोनोरिया, क्लॅमिडीया, एड्स आणि सर्वाइकल कैंसर यासारख्या लैंगिक संबंधित आजारांना (STD)आळा घालण्याचे दक्षिण आशियाई सरकारचे उद्दीष्ट आहे.

Thailand condom news
Kasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचं टेंशन वाढलं! इच्छुकांकडून बंडखोरीचा इशारा

थायलंडमध्ये 2021 मध्ये 15 ते 19 वयोगटातील 1000 थाई मुलींपैकी 24.4 मुलींनी जन्म दिला. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार याच वयोगटातील मुलींचे जागतिक प्रमाण 42.5 आहे. गेल्या काही वर्षांत लैंगिक आजारांमध्ये (STD) झालेली वाढ लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन अधिकृत आकडेवारीनुसार, 2021 मध्ये STD मुळे सर्वात जास्त प्रभावित 15 ते 19 आणि 20 ते 24 वयोगटातील लोक होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com