Kasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचं टेंशन वाढलं! इच्छुकांकडून बंडखोरीचा इशारा

Kasba Bypoll Election Congress Candidate: काँग्रेसच्या इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे.
Kasba Bypoll Election Congress Candidate
Kasba Bypoll Election Congress Candidatesaam tv

Pune Bypoll Election Candidates : विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र काँग्रेससमोर उमेदवार निश्चित करण्याचं मोठं आव्हान आहे. कारण काँग्रेसच्या इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे.

महाविकासआघाडीकडून चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी लढणार असून कसब्याची जागा काँग्रेस लढणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादीने चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी दिल्याची सूत्रांची माहिती आहे, तर कसबा मतदारसंघासाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले होते.

Kasba Bypoll Election Congress Candidate
Mumbai University Exams: पुढे ढकलण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांबाबात मोठी अपडेट!

परंतु आता काँग्रेससमोर बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान आहे. कारण इच्छूक उमेदवारांनी काँग्रेसची कोंडी केली आहे. महाविकास आघाडीकडून आज उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजपाने टिळक परिवारातील उमेदवार न दिल्याने कांग्रेसमधील रोहित टिळक यांना संधी देण्याच्या मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Kasba Bypoll Election Congress Candidate
Aurangabad News : प्रेमाचा दु:खद अंत! 'तू जो पाहिला त्याच्यासोबत खूश रहा', चिठ्ठी लिहत तरुणाची आत्महत्या

दरम्यान काँग्रेसच्या उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीही रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष केला आहे. तर दुसरीडे बाळासाहेब जांभेकर यांनी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचं टेंशन वाढलं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि उमेदवार निश्चित करण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवन येथे नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

Edited By - Chandrakant Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com