71-year-old Devichand Kishanlal Agarwal (left), who passed away due to the severe mental shock of his grandson Ketan Agarwal's (right) brutal murder at Lohagad Fort. saam tv
मुंबई/पुणे

अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर; केतनच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने आजोबांचेही निधन

Devichand Agarwal: लोहगड किल्ल्यावर झालेल्या नातू केतन अग्रवालच्या हत्येच्या धक्क्याने आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे ७१ व्या वर्षी दुःखद निधन. अग्रवाल कुटुंबावर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पुणे: लोहगड किल्ल्यावर खून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. केतनचे आजोबा देवीचंद किसनलाल अग्रवाल यांचे केतनच्या विरहाने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी देवीचंद किसनलाल अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून केल्याची घटना उघड झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांवर मोठा आघात झाला होता.

या धक्क्याचा सर्वाधिक परिणाम घरातील ज्येष्ठ सदस्य देवीचंद अग्रवाल यांच्यावर झाला. सततच्या मानसिक तणावामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज सकाळी सुमारे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार देवीचंद अग्रवाल हे मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयाशी संबंधित एक मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारत असतानाच 18 जून रोजी त्यांचा नातू केतन याची लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले असताना त्याला ढकलून हत्या करण्यात आली. आपल्या डोळ्यादेखत लाडका नातवाचा खून झाल्याचं कळताच आजोबा देवीचंद अग्रवाल यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचं कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. केतनची हत्या होऊन काही दिवस होताच देवीचंद अग्रवाल यांचं निधन झाल्याने परिवारावर दुसऱ्यांदा दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे अग्रवाल कुटुंबीयांवर पुन्हा एकदा दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. देवीचंद अग्रवाल यांची अंत्ययात्रा दि.(5) रोजी सकाळी १० वाजता लोढा बेलमांटो सोसायटी येथून निघणार असून, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साटम हसले, राज ठाकरे भडकले, आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतोय

खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप, उपचार नाकारल्यास 5 लाखांचा दंड

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे, अंबरनाथच्या उपनगराध्यक्षांकडून भ्रष्टाचाराचं समर्थन

दोन महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे, नागरिकांचा संताप, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे

PM Modi Death Threat: पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; जगभरात खळबळ, तपास यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT