After Raigad Irshalgad Landslide Pune Is on Alert Mode  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पुणे अलर्ट मोडवर, जिल्हा प्रशासनाने 'या' 23 गावांवर केलं लक्ष केंद्रीत...

Pune Latest News: इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पुणे अलर्ट मोडवर, जिल्हा प्रशासनाने 'या' 23 गावांवर केलं लक्ष केंद्रीत...

साम टिव्ही ब्युरो

Pune Latest News: इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दरड प्रवण गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी. तसेच पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, असे निर्देश पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

पालकमंत्री पाटील यांनी आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती, धरणातील पाण्याची स्थिती, दरड प्रवण आणि पूरप्रवण गावांची माहिती घेतली.

तालुका पातळीवर प्रत्येक आठवड्यात दरड प्रवण गावांना भेटी देण्यात याव्यात. या गावांमध्ये धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. नागरिकांना आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात यावी. दरडी पडण्याचा धोका असलेल्या भागात पावसाच्यावेळी वाहतुकीसाठी रस्ते बंद ठेवावेत.  (Latest Marathi News)

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होणार नाही यादृष्टीने आवश्यक प्रतिबंध घालण्यात यावे. आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधने आणि मनुष्यबळाचे नियोजन तयार ठेवावे. विशेषत: दरड प्रवण क्षेत्रात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात येवून दरड प्रवण आणि पूरप्रवण गावांबाबत आढावा घेण्यात आला. तालुका स्तरावर पथके तयार करून दरड प्रवण गावातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. आपत्तीच्यावेळी नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी जवळची सुरक्षित निवाऱ्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दरड प्रवण गावांबाबत तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षाद्वारे माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील डोंगर उतारावरील वाड्या, वस्त्या आणि गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने या गावांवर लक्ष केलं केंद्रीत

1 मावळ

2 लोहगड, मावळ

3 बोरज, मावळ

4 तुंग, मावळ

5 माळवाडी, मावळ

6 7 घोळ भुशी मावळ वेल्हा

8 मौजे जांभुळवाडी (कोर्ले), भोर

9 फुलवडे अंतर्गत भगतवाडी, आंबेगाव

10 माळीण अंतर्गत पसारवाडी, आंबेगाव

11 आसाणे, आंबेगाव

12 जांभोरी अंतर्गत काळेवाडी क्र 1 व 2 आंबेगाव

13 आंबेगाव

14 तळमाची वाडी, जुन्नर

15 माऊ गबाळे वस्ती, मावळ

16 माऊ मोरमाची वाडी, मावळ

17 भोरगिरी पदरवस्ती, खेड

18 भोमाळे, खेड

19 मौजे पांगारी सोनारवाडी, भोर

20 मौजे डेहेन, भोर

21 मौजे आंबवणे, वेल्हे

22 मौजे धानवली खालची, भोर

23 मौजे घुटके ता. मुळशी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT