Tulsi Lake Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level Today : मुंबईकरांची तहान भागवणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो; इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध?

Mumbai Rain News : सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मुंबईची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात मागील दोन दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

मुंबईला ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा आज मध्यरात्री ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही ८०४.६० कोटी लीटर इतकी आहे.  (rain

गेल्या वर्षी हा तलाव १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. तर २०२० मध्ये २७ जुलै; २०१९ मध्ये १२ जुलैला हा तलाव ओसंडून वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर इतकी असून आज पहाटे ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर म्हणजेच ३९.६१ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. (Maharashtra News)

कोणत्या तलावात किती जलसाठा?

  • अप्पर वैतरणा तलावात ३,३६०.५० कोटी लीटर

  • मोडक-सागर तलावात ८,१२१.४ कोटी लीटर

  • तानसा तलावात १०३०३.१ कोटी लीटर

  • मध्य वैतरणा जलाशय ९८०९.५ कोटी लीटर

  • भातसा तलावात २३,१९२ कोटी लीटर

  • विहार तलावात १७४२.७ कोटी लीटर

  • तुळशी तलावात ८०४.६ कोटी लीटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT