Mumbai-Goa Highway News: मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाचा संरक्षण कठडा कोसळला; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO

Mumbai-Goa Highway Latest News: महाड शहर परिसरातील शेडाव नाका येथील मुंबई-गोवा महामार्गाचा संरक्षण कठडा कोसळला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Mumbai-Goa highway bridge wall collapsed
Mumbai-Goa highway bridge wall collapsedSaam TV
Published On

Mumbai-Goa Highway Latest News: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सावध राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अशातच मुंबई-गोवा महामार्गावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

महाड शहर (Mahad City) परिसरातील शेडाव नाका येथील मुंबई-गोवा महामार्गाचा संरक्षण कठडा कोसळला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने यावेळी महामार्गावरून कोणतेही वाहने जात नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Mumbai-Goa highway bridge wall collapsed
Irshalwadi Landslide: आम्ही शाळेत होतो, म्हणून वाचलो; आई-बाबांना पळताही आलं नाही; घटनाक्रम सांगताना मुलाला हुंदका अनावर

मुंबई-गोवा महामार्गाचा (Mumbai Gao Highway) सर्व्हिस रोड आणि सावित्री नदी यांच्यामध्ये हा संरक्षण कठडा बांधण्यात आला होता. महामार्ग चौपदरी करणाची ठेकेदार कंपनी L&T ने हा संरक्षण बांधला होता. विशेष बाब म्हणजे बुधवारी महामार्गावरील नडगाव येथील संरक्षण भिंत कोसळली होती.

त्यातच आज शेडाव येथील संरक्षण कठडा कोसळल्याने झालेल्या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, संरक्षण कठडा कोसळतानाचा हा व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Mumbai-Goa highway bridge wall collapsed
Raigad Landslide News Today: आमची लेकरं कुठे गेली हो.., मुलांना शोधण्यासाठी आई-वडिलांची धावाधाव; इर्शाळवाडीत आक्रोश

पिंपरी-चिंचवड शहरात रस्ता खचला

पिंपरी-चिंचवड शहरात रस्ता खचल्याची घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली. शहरातील पिंपळे सौदागर परिसरामध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना इमारतीजवळ असलेला रस्ता अचानक खचला. प्लॅनेट मिलेनियम सोसायटी जवळ असलेल्या रस्त्याला लागून एका इमारतीच्या बांधकामसाठी एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता.

त्या खड्ड्याला लागून असलेला रस्ता आज सकाळी अचानक खचला आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी एका बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. रस्ता खचल्यामुळे0पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून मोठे नुकसान झालं आहे. दरम्यान, रस्ता खचल्याची दृश्य एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com