Latest News on ulhasnagar news अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथनंतर आता बिबट्याची पावले उल्हासनगरकडे; एकच खळबळ!

गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ (Ambernath) तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने आपली पावले आता उल्हासनगर शहराकडे वळवली आहेत.

अजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर : गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ (Ambernath) तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने आपली पावले आता उल्हासनगर शहराकडे वळवली आहेत. उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या सोंग्याची वाडी परिसरात नुकतेच बिबट्याचे दर्शन झाले. (Latest News on ulhasnagar news)

धक्कादायक म्हणजे उल्हासनगर मध्ये पोहोचण्यासाठी बिबट्याने आयुध निर्माण वसाहत आणि उल्हासनगर दरम्यान असणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्ग ओलांडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बातमीने उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जुन्नर वन क्षेत्रातून आलेला बिबट्या (Leopard) गेल्या काही दिवसांपासून शहरांच्या वेशीवर येऊ लागला आहे. गेल्या आठवड्यात या बिबट्याने अंबरनाथ शहरातील आयुध निर्माण संस्थेच्या वसाहतीत दिसला होता. वनविभागाकडून बिबट्याच्या शोधाचा प्रयत्न सुरू असतानाच बिबट्याने आता अत्यंत दाटीवाटीच्या अशा उल्हासनगर शहरात दर्शन दिले आहे. (Ulhasnagar news in marathi)

हे देखील पहा-

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराच्या वेशीवर असलेल्या सोंग्याची वाडी या परिसरात एका मुलीने सायंकाळच्या वेळी बिबट्याला पाहिल्याचे सांगितले आहे. वन विभागाकडे याची माहिती पोहोचताच त्यांनी तातडीने या परिसरात धाव घेऊन येथील जनतेला सावध राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

भरत नगर परिसरात सावधान राहण्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. एकूणच बिबट्याच्या संचाराच्या बातमीने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, सोंग्याची वाडी परिसरात एका पाण्याच्या खळग्या कडे काही संशयित ठसे आढळले असून वन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

SCROLL FOR NEXT