Badlapur Crime Saam TV
मुंबई/पुणे

५ वर्ष प्रेमसंबधानंतर प्रियकराचा ऐनवेळी लग्नास नकार; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

सोमवारी पहाटे बदलापूरजवळ रेल्वे रुळावर तरुणीचा मृतदेह आढळून आला.

अजय दुधाणे

बदलापूर : ५ वर्षाच्या प्रेमसंबधानंतर प्रियकराने ऐनवेळी लग्नाला नकार दिल्यानं एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये (Badlapur) घडली आहे. सोमवारी पहाटे बदलापूरजवळ रेल्वे रुळावर तरुणीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी (Police) कासगाव इथं राहणाऱ्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे. (Badlapur Crime News)

कल्याणला राहणाऱ्या २४ वर्षीय मृत तरुणीची बदलापूरच्या कासगावमध्ये राहणाऱ्या करण लहाने या तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. यानंतर गेल्या ५ वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र मृत तरुणीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने टाळाटाळ करत लग्नाला नकार दिला. यानंतर मृत तरुणीच्या कुटुंबीयांनीही करणच्या घरी जाऊन विनवणी केली.

मात्र, त्यांनाही करणच्या कुटुंबीयांनी हाकलून दिल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केलाय. या सगळ्यानंतर या तरुणीने करण यांच्याविरोधात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र त्याची पोलिसांनी दखल घेतली नाही. या तक्रारीची करणला माहिती मिळताच करणच्या मित्रांनी या तरुणीला फोन करत करण आत्महत्या करत असून तू लवकर ये, असं सांगितलं.

त्यामुळे रविवारी दुपारी ही तरुणी करणला भेटण्यासाठी म्हणून बदलापूरला गेली, मात्र ती घरी परत आलीच नाही. सोमवारी पहाटे बदलापूरजवळ रेल्वे रुळावर तिचा मृतदेह आढळून आला. यानंतर करणने या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार तरुणीच्या कुटुंबीयांनी केली. त्यानुसार पोलिसांनी करण लहाने याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, करणला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भोई यांनी दिली आहे. मात्र कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT