Mumbai Police  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News: चार वर्षांची चिमुकली अन् आईची झाली ताटातूट... अख्खं पोलीस प्रशासन लागलं कामाला

Mumbai News: कल्याण पश्चिम येथील जोशी बागेत राहणारी सुनिता माळी ही २८ वर्षीय महिला फुले आणि पाने विक्रीचे काम करते. सोमवारी ती कल्याण पश्चिम येथील एपीएमसी मार्केटमध्ये आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News

कल्याण एपीएमसी मार्केटमधून एका फूले आणि पाने विक्रेत्या महिलेची चार वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. श्वान पथक, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तीन पथकांना १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मुलीचा शोध लावण्यात यश आले आहे. या मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून मुलीच्या आईने पोलिसांचे आभार मानले.

कल्याण पश्चिम येथील जोशी बागेत राहणारी सुनिता माळी ही २८ वर्षीय महिला फुले आणि पाने विक्रीचे काम करते. सोमवारी ती कल्याण पश्चिम येथील एपीएमसी मार्केटमध्ये आली होती. तिच्यासोबत तिची चार वर्षांची मुलगी अनन्या देखील होती. यावेळी मार्केटमधून अनन्या अचानक गायब झाली. कोणी तरी तिला घेऊन गेल्याचा संशय तिच्या आईला आला. एपीएमसी मार्केट परिसरात नशेखोरांचा वावर असल्याने घाबरलेल्या आईने कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल पवार यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तीन पथके तयार केली. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे,वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल पवार, पोलीस निरिक्षक लक्ष्मण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी किरण वाघ, महिला पोलीस अधिकारी दीपाली वाघ, पोलीस उपनिरिक्षक संतोष भुंडेरे, अजिंक्य मोरे, यांच्या पथकाने मुलीचा तपास सुरू केला. यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. जवळपास १८ तास पोलिसांची तीन पथके या मुलीचा शोध घेत होती, अशी माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

अखेर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस पंकज परदेशी यांना माहिती मिळाली की ही मुलगी एका महिलेकडे सुखरूप आहे. रात्री तीनच्या सुमारास पोलीस पथक त्या महिलेच्या घरी गेले. मुलगी इतत्र भटकत असताना त्या महिलेने तिला सुरक्षेसाठी तिला घरी ठेवले असल्याचे सांगितले. चार वर्षाच्या अनन्या माळीला पोलिसांनी तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे. 18 तास आपल्या चिमुकलीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेच्या माऊलीचे आपल्या चिमुकलीला बघून डोळे पाणवले. या चिमुकलीच्या आईने पोलिसांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT