advocate morcha at nagar saam tv
मुंबई/पुणे

Nagar News : विविध मागण्यांसाठी हजारो वकिलांचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील वकील संघटनांसह आमदार संग्राम जगताप, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांनीही या मोर्चात सहभाग घेतला होता.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar Advocate Morcha News :

वकील संरक्षण कायदा पारित करावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच वकील संघटनांनी आज (शुक्रवार) हजारोंच्या संख्येने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अहमदनगर शहरातील जिल्हा न्यायालयापासून हा माेर्चा काढण्यात आला. (Maharashtra News)

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आढाव या वकील दांपत्याच्या निर्घृण खून प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. या खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का प्रमाणे कारवाई करावी. वकिलांवर होणारे हल्ले, खोट्या केसेस यासाठी वकील संरक्षण कायदा शासनाने मंजूर करावा अशी मागणी माेर्चेक-यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी काही निवडक वकील बांधवांना आत मध्ये सोडण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यामुळे काही काळ पोलीस आणि वकील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली.

या माेर्चात नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील वकील संघटनांसह आमदार संग्राम जगताप, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांनीही या मोर्चात सहभाग घेतला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील वकील संघटनांनी 29 जानेवारीपासून काम बंद आंदोलन ठेवले होते. वकिलांना पक्षकाराची बाजू मांडताना स्वतःचेही संरक्षण तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे वकील संरक्षण कायदा सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे यांनी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलकांवरही होणार गुन्हा दाखल

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

SCROLL FOR NEXT