Maval News दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेसाठी प्रशासन सज्ज

कार्ला परिसरात कलम 144 लागू, परिसरात दारुबंदीचे आदेश

दिलीप कांबळे

दिलीप कांबळे

मावळ - महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मावळ मधील कार्ला गडावरील आई एकविरा (Ekvira Devi) देवीची चैत्री यात्रा व मानाचा पालखी सोहळा आठ एप्रिल रोजी कार्ला गडावर होणार आहे. यात्रा काळात लाखो भाविक गडावर येण्याची शक्यता लक्षात घेता. प्रशासनाकडून मोठी तय्यारी करण्यात आली आहे. भाविकांना  पारंपारिक पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाचे सर्व विभाग दक्ष असतील अशी माहिती मावळचे (Maval) तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

हे देखील पहा -

यात्रा तयारीची आढावा बैठक आज कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिर प्रांगणात पार पडली. या बैठकीला मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह लोणावळा विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील,श्री एकविरा देवस्थानचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी व स्थानिक व्यवस्थापक उपस्थित होते.

कोरोनामुळे मागील दोन वर्ष देवीची यात्रा झाली नव्हती. यावर्षी कोरोनाचे निर्बंध हटल्याने कार्ला गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पुणे जिल्हाधिकारी यांनी कार्ला परिसरात भादंवी कलम 144 लागू केले आहे. तसेच यात्रेचे मुख्य दिवस असलेल्या दिवशी म्हणजेच दिनांक सात, आठ व नऊ एप्रिल रोजी कार्ला, वेहेरगाव, वाकसई, मळवली, वरसोली परिसरात दारुबंदी आदेश लागू केले आहेत.गडावर शोभेची दारु व फटाके घेऊन जाणे, वाजविणे, कोंबड्या, बकरे घेऊन जाणे, बळी देणे अशा प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

SCROLL FOR NEXT