Eknath Shinde and aditya thackeray  saam tv
मुंबई/पुणे

हल्ला झाला त्याच कात्रज चौकात उदय सामंत घेणार सभा; शिंदे गट देणार प्रत्युत्तर

शिंदे गट आता आमदार आदित्य ठाकरे यांच्या सभांना प्रत्युत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या फुटीनंतर माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांची पुण्यात सभा होती. या सभेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही पुणे दौरा होता. यावेळी कात्रज चौकात शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समोर आले होते. आता याच कात्रज चौकात आमदार उदय सामंत सभा घेणार आहेत.

शिंदे गट आता आमदार आदित्य ठाकरे यांच्या सभांना प्रत्युत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या आठवड्यात पुण्यातील कात्रज चौकात शिंदे गटाकडून सभा घेण्यात येणार आहे. या संदर्भात नियोजन सुरू असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसापूर्वी पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला होता. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत झाला. यावर पुणे पोलिसांनी मध्यरात्री तपास करुन कारवाई सुरू केली, भारती विद्यापीठ पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक केली होती.

उदय सावंत हल्या प्रकरणी कोथरुड पोलिसांत (Police) गुन्हा दाखल नोंद झाला होता. पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरण संजय मोरे यांनी ट्विट केले.

या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे गट पुण्यात कात्रज चौकात सभा घेणार आहे, त्यामुळे आता पुन्हा शिंदे गट आणि शिवसेना वाद चिघळणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

भारतीयांमध्ये Financial Planning चा गंभीर अभाव; 5 पैकी 2 व्‍यक्‍तींकडे 4 महिने पुरेल इतका आपत्‍कालीन निधी

SCROLL FOR NEXT