Aditya Thackeray On Nilam Gorhe Saam TV
मुंबई/पुणे

Aditya Thackeray On Nilam Gorhe : 'यह मोह मोह के धागे...', शिवसेनेनं नीलम गोऱ्हेंना 21 वर्षांत काय काय दिलं? आदित्य ठाकरेंनी पाढाच वाचला

Political News : नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशवर अदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News :  ठाकरे गटाच्या विधानपरिषद आमदार आणि विधानपरिषेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज शिवसेनेते प्रवेश केला आहे. आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. नीलम गोऱ्हे यांनी हा निर्णय घेतल्याचं अनेकांना विश्वास बसत नाही.

 नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशवर अदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे. खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच शिवसेनेने नीलम गोऱ्हे यांना काय दिलं याची लिस्टची आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये मांडली.

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं?

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे. एकाच व्यक्तीला ४ वेळा विधानपरिषदेवर जाण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिल्यावरही, २१ वर्ष तिथे असूनही, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही... एकच गाणं आठवतं, यह मोह मोह के धागे... खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!'

आरोग्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा

सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, मागील सहा महिन्यापासून तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा होती. नीलम गोऱ्हेंकडे सगळ्यांचं बारीक लक्ष होतं. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुणासाठी थांबणार नाही. तुम्हाला भावी आरोग्यमंत्री पदासाठी आधीच शुभेच्छा देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT