Aditya Thackeray
Aditya Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

आदित्य ठाकरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर; मनिषा कायंदेंनी केला खुलासा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पर्यावरण खात्यातील महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय यंत्रणांनी दिली असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा समोर येणार आहे. यावरुन शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खुलासा केला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या आरोपांना आज मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

सध्या राज्यभरात आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाला आता भाजप घाबरली आहे. त्यामुळे आता भाजपने आदित्य ठाकरे मंत्री होते त्या पर्यटन विभागाची आता केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे, असा आरोप कायंदे यांनी भाजपवर (BJP) केला आहे. भाजपला आदित्या ठाकरे यांचा दौरा थांबवायचा आहे, म्हणून केंद्रीय यंत्रणांचा तपास लावला जात आहे, असंही कायंदे म्हणाले.

शिंदे नावालाच मुख्यमंत्री; मनिषा कायंदेंचा हल्लाबोल

भाजपतर्फे भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री परिषद दिल्लीत आयोजिक केली होती. या परिषदेत महाराष्ट्राकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावरुन आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेच्या (ShivSena) मनिषा कायंदे यांनीही यावरुन टोला लगावला. ' दिल्लीत मुख्यमंत्री परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे, म्हणजे एकनाथ शिंदे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहेत, असं ट्विट मनिषा कायंदे यांनी केले आहे.

या परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहे. या परिषदेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

Kopardi Death Case: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या

Today's Marathi News Live : नसीम खान नाराज; पक्षश्रेष्ठींकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु

Josh Baker Death: धक्कादायक! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन, क्रिडाविश्वात शोककळा

India Heat Wave Update: सूर्य आग ओकतोय! देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअसवर

SCROLL FOR NEXT