President Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ वे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSaam Tv
Published On

नवी दिल्ली: द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. सरन्यायाधीश एन.व्ही.रमना यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ वे राष्ट्रपती बनले आहेत.

मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून इतिहास रचला आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या आणि सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत. तसेच राष्ट्रपती बनणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

President Droupadi Murmu
President Droupadi Murmu: माझ्यासाठी सार्वजनिक हित सर्वोपरी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती म्हणून पहिले भाषण केले. आपल्या भाषणात म्हणाल्या की, मी ओडिशातील एका गावातून जीवन प्रवास सुरू केला आहे. हे पद माझे नाही तर देशातील गरिबांचे कर्तृत्व आहे. लोकशाहीच्या बळावर मी इथंपर्यंत पोहोचली आहे. मला अभिमान वाटत आहे. माझ्यासाठी सार्वजनिक हित सर्वोपरी आहे.

देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. सर्वोच्च पद बहाल केल्याबद्दल धन्यवाद, असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com