Bhandul BMC Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Mulund News: बाळ रडतं म्हणून तोंडाला लावली चिकटपट्टी, भांडुपमधील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

BMC Hospital: या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रसुती रुग्णालयातील नवजात बाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Priya More

Mulund News: बाळ रडत असल्यामुळे नर्सने त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून (Mumbai) समोर आला आहे. भांडुपमधील महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात (Savitribai Phule Hospital) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत नर्सला निलंबित केले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रसुती रुग्णालयातील नवजात बाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपमधील मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवजात बाळ रडू नयेत म्हणून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचे घृणास्पद काम या रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सकडून केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रिया कांबळे या महिलेची प्रसूती झाली होती. बाळाला कावीळ झाली असल्यामुळे त्याला एनआयसीयू यूनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं.

बाळाला पाहण्यासाठी प्रिया कांबळे या एनआयसीयू युनिटमध्ये गेल्या त्यावेळी त्यांच्या बाळाच्या तोंडामध्ये चोखणी देऊन त्याचे तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी पाहिले. बाळ रडून रडून लाल झाले होते. आपल्या बाळाची ही अवस्था पाहून प्रिया कांबळे यांना धक्का बसला. त्यांनी यासंदर्भात त्याठिकाणी असलेल्या नर्सला विचारणा केली. तर या नर्सने त्यांना उद्धटपणे उत्तर दिले. बाळ रडत असल्यामुळे बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली जात असल्याचे या नर्सने सांगितले.

पालिकेच्या याच सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहाच्या एनआयसीयू युनिटमध्ये ठेवण्यात आलेली नवजात बाळ दगावल्याची घटना समोर आली होती. याच रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून एनआयसीयू युनिटमध्ये कार्यरत असलेल्या सविता भोईर या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. तसेच आणखी एका नर्सला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोरंट पॉवरचे वृक्षतोड उबाठा शिवसेनेने पाडली बंद

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT