Adani  Saam tv
मुंबई/पुणे

Adani Realty : 'अदानी रियल्टी'ची वांद्र्यातील मोक्याच्या जागेसाठी सर्वाधिक बोली; महामंडळाला मिळणार इतक्या हजार कोटींचा महसूल

Adani Realty Latest Update : मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन येथे मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा आहे. ही तब्बल २४.२ एकर जमीन आहे. या जागेसाठी सर्वाधिक बोली लावण्याचा मान अदानी रियल्टीने पटकावला आहे.

Vishal Gangurde

Adani Realty Latest News:

मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन येथे मोक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा आहे. ही तब्बल २४.२ एकर जमीन आहे. या जागेसाठी सर्वाधिक बोली लावण्याचा मान अदानी रियल्टीने पटकावला आहे. (Latest Marathi News)

अदानी रियल्टीने सर्वाधिक बोली लावल्याने त्यांनाच या भूखंडाची मालकी मिळणार आहे. या बोलीवर महामंडळाच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. या भूखंडाच्या बोलीतून एमएसआरडीसीला ८ हजार रुपये कोटींचा महसूल मिळणार आहे.

मुंबईच्या वांद्रे पश्चिम भागात एमएसआरडीसीचा भूखंड असून त्याच्या विक्रीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या भूखंडासाठी अदानी रियल्टी आणि एल अॅण्ड टी कंपनी यांच्या निविदा पात्र ठरल्या.

या भूखंडाच्या विकासातून मिळणाऱ्या महसूलातून २२. २७ टक्के हिस्सा देण्याची बोली अदानी रियल्टीने लावली. तर एल अँड टीने महसुलीतील १८ टक्के हिस्सा देण्याची बोली लावली होती. यामुळे अदानी रियल्टीने ही बोली जिंकली.

वांद्रे येथील २४ एकराचा भूखंड हा मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रासाठी आरक्षित होता. वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईत सात ठिकाणी मलनिस्सारण केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहेत. त्यानुसार वांद्रे येथे एक करणे गरजेचे आहे, असा दावा वॉचडॉग फाऊंडेशनने केला आहे. मात्र, या जागेवर अदानी रियल्टीने बोली लावल्यानंतर आता मलनिस्सारण केंद्र कुठे उभारायचे, असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, अदानी रियल्टीने ४ टक्के अधिक बोली लावली. त्यामुळे प्रतिस्पर्धी एल अँड टी कंपनीला अदानी रियल्टीने मागे टाकलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.तसेच या बोलीत तिसरा प्रतिस्पर्धी मेफेअर हाऊसिंगची बोली अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Skin Glow Tips: महिलांनी चेहऱ्यावर लावा या 5 गोष्टी, मेकअप न करता तुम्हीच दिसाल सुंदर

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचा प्रयत्न

Ration Card: कामाची बातमी! ७० लाख रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता; १ एप्रिलपासून नियम बदलणार

भाजप आमदाराच्या मुलाचा टोल नाक्यावर राडा, पैसे मागितले म्हणून कर्मचाऱ्याला मारले, घटना CCTV मध्ये कैद

Rashmika-Vijay Wedding : लगीन घटिका समीप आली! रश्मिका-विजय आज अडकणार लग्नबंधनात; पाहा शाही लग्नाचा मुहूर्त कधीचा?

SCROLL FOR NEXT