Tunisha Sharma Saam Tv
मुंबई/पुणे

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक

टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडियोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Tunisha Sharma : टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडियोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वालीव पोलिसांनी (Police) तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचा सहकलाकार शिझान खान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिझानने प्रेमसंबध तोडल्याने निराश झालेल्या तुनिषाने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली होती.

तुनिषा शर्मा (Actress) ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे चित्रिकरण वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूप मध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्‍यांना समजली. तिला वसईतील (Vasai) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तिने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. (Latest Marathi News)

मीरा रोड येथे राहणार्‍या तुनिषाचे अभिनेता शिझान खान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने प्रेमसंबंध तोडल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी फिर्याद तुनिषाच्या आईने दिली होती. त्या फिर्यादीवरून आम्ही झिशानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशीरा त्याला अटक केली आहे अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली. बाल कलाकार म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण करणारी तुनिषा विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT