Ahmednagar : शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी बसच नाही; संतापलेल्या विद्यार्थिनींनी केला बस स्थानकासमोरच रास्तारोको

विद्यार्थ्यांची कुचंबना होत असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
Ahmednagar News
Ahmednagar News Saam Tv

सचिन बनसोडे

Ahmednagar News : दुपारी शाळा सुटल्यानंतर गावात जाण्यासाठी तासंतास बस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी अहमदनगर शहरातील तारकपूर बस स्थानकासमोर रास्तारोको आंदोलन केलं आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची कुचंबना होत असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar News
Sambhaji Raje : 'हिवाळी अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैशांची...'; संभाजीराजे छत्रपती सत्ताधारी-विरोधकांवर भडकले

अहमदनगर (Ahmednagar) शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून मुली शिक्षणासाठी दररोज बसने ये जा करत असतात. विशेषतः राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावच्या परिसरातील अनेक विद्यार्थीनी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मात्र वांबोरीसाठी एसटी महामंडळ गाडी वेळेवर सोडत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी कुचंबना होत आहे.

आज, शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून अनेक विद्यार्थिनी बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. मात्र सायंकाळचे साडेसात वाजले तरी एसटी महामंडळाने वांबोरीसाठी बस सोडली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ताराकपूर बस स्टॅन्ड समोर रास्तारोको करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

Ahmednagar News
Chandrapur News: उद्घाटनावेळी मंत्री-खासदारांमध्ये वाद; मुनगंटीवार यांना धानोरकरांनी कार्यक्रमातच सुनावले, कारण?

दुपारपासून या विद्यार्थिनी बस कधी लागेल यासाठी विचारणा करत होत्या. मात्र सुमारे तीन ते चार तासापासून ताटकळत ठेवल्याने या विद्यार्थिनी संतापल्या होत्या. दररोज वेळेवर बस उपलब्ध व्हावी अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली आहे.

रास्तारोको झाल्याचे कळताच ल तोफखान पोलिसांनी तातडीने तारकपूर बसस्थानकावर धाव घेतली. त्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ वांबोरीसाठी बस उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानंतर या संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com