Prajakta Mali  Saam tv
मुंबई/पुणे

Prajakta Mali : महिलांच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवताय; प्राजक्ता माळी भर पत्रकार परिषदेत रडली, VIDEO

Prajakta Mali Latest News : बीडमधील प्रकरणात इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला. यावर सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीनं केलीय.

Vishal Gangurde

मुंबई : 'माझ्या फोटोचा संदर्भ जोडून कुणासोबतही नाव जोडणार का? ही बाब अतिशय निंदनीय आहे. राज्यातील राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. 'त्या पण परळीला येतात का, असं कुत्सित वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं. ते महिलांच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवत आहेत, असं सांगताना अभिनेत्री प्राजक्ता माळी भर पत्रकार परिषदेत रडली. यावेळी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या प्रकरणात उचित कारवाई करावी, अशी मागणी केली.

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट सुरू आहे, असं सांगतानाच अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदानाच्या नावांचा उल्लेख केला होता. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या नावाच्या उल्लेख केल्याने सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानंतर जाहीर पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीने धस यांच्या वक्तव्यावर आणि अशी वक्तव्ये करणाऱ्या राजकारण्यांवर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ताने केली.

प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली?

भर पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी म्हणाली, 'राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला मोठी होऊ शकत नाही का? ही अशी टिप्पणी करून तुम्ही स्वतःची मानसिकता दाखवत आहात. अशा प्रकारची वक्तव्ये करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यांनी कुत्सितपणे टिप्पणी केली. प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी उपयोग केला आहे. या राजकारण्यांनी जी टिप्पणी केली आहे, ती शोभत नाही. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं याचं भान नाही. त्यांनी तितक्याच विनम्रतेने त्यांनी जाहीर माफी मागावी'.

'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते की, या दोन व्यक्ती वाक्य बोलून गेल्या आहेत. त्यावर हजार व्हिडिओ बनवतात. इतके वाईट मथळे देतात. समोरच्या माणसांच्या आयुष्यात वादळ येऊ शकतो. समोरच्या माणसांच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं. करिअर बर्बाद होऊ शकतं. नैराश्य येऊ शकतं. टीआरपी वाढवण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो. त्या बातम्या किती वेगवेगळ्या पद्धतीने वाचल्या, असे प्राजक्ता माळी पुढे म्हणाली. 'माझ्या आईला रात्रभर झोप नाही. माझ्या भाऊने सोशल मीडियावर बंद केला. माझ्या कुटुंबावर अत्यंत वाईट परिणाम होतो. एका मुलीची अशा प्रकारे प्रतिमा डागाळली जाणे योग्य नाही, असेही ती म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Garam Masala Recipe: बाजारात मिळतो तसा गरम मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपला कोल्हापूर महानगरपालिकेत जास्त जागा सोडाव्यात - भाजपची मागणी

PF काढणं ते ट्रान्सफर करणे, EPFO च्या नियमात झाले ६ महत्त्वाचे बदल, वाचा A टू Z माहिती

Dhurandhar Viral Video: रणवीर सिंगच्या धुरंधरच्या गाण्याची पाकिस्तानमध्ये हवा; लग्नात थिरकतात वऱ्हाडी, पाहा व्हायरल VIDEO

Guru Gochar: 12 वर्षांनी तयार होणार हंस-केंद्र त्रिकोण राजयोग; 3 राशींचं नशीब बदलून मिळणार आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT