Sumeet Raghavan Saam Tv
मुंबई/पुणे

Sumeet Raghvan Tweet: आरे आंदोलक फालतू आणि बोगस, अभिनेता सुमित राघवनचं वादग्रस्त ट्वीट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मेट्रोच्या आरे येथील नियोजित कारशेडवरुन मोठा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने कारशेड तिथेच उभारण्याचा निर्णय घेतला. (Mumbai News)

पर्यावरण प्रेमींचाही अडथळा राज्य सरकारला आहे. याच पर्यावरण प्रेमींविरोधात अभिनेता सुमित राघवनने एक ट्वीट करत त्यांना फालतू बोगस म्हटलं आहे. सुमित राघवन या ट्वीटमुळे ट्रोल होताना दिसत आहे. (Maharashtra News)

सुमित राघवनने एक व्हिडीओ रिट्वीट केला आहे. ज्यात फ्रेंचमधील नागरिक वातावरण बदलाबाबत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना हटवत आहेत. या ट्वीटला 'फ्रेंचचे नागरिक वातावरण बदल आंदोलकांची काळजी घेताना' असं कॅप्शन आहे. सुमीतनं हा व्हिडिओ रिट्विट करत आरे आंदोलकांबरोबरही असंच झालं पाहिजे असं म्हटलं आहे. त्यावरून नवा वाद निर्माण होऊ शकतो.

'आरे आंदोलकांसोबतही असंच झालं पाहिजे होतं. डोक्यावर चढून बसले होते हे बोगस आणि फालतू बिनकामाचे लोक. झोलाछाप' असं सुमितने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

एका यूजरने सुमीतचा एका कार्यक्रमातील आरेविषयी बोलतानाचा सीन ट्वीट केला आहे. हा तूच आहेत ना? चाळीस पैशांसाठीच करतोय ना? असा सवाल या यूजरने विचारला आहे. या सीनमध्ये आरे जंगलातून जे बिबटे मानवी वस्तीत येतात त्याला आपणच जबाबदार असल्याचं सुमीत बोलत आहे. तर विकासाच्या नावाखाली आपण कशी जंगलांची कत्तल करतोय हे सुमीत या सीनमध्ये सांगत आहे.

आरे येथील कारशेडला विरोध करण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) सर्वात पुढे होती. आदित्य ठाकरे याबाबत वेळोवेळी आपली भूमिका मांडताना दिसले आहेत. त्यामुळे याबाबत शिवसेनेच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे, हे देखील पाहावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT