pune news  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : स्वतःच्या अंगावर शाई ओतून चंद्रकांत पाटील यांचा केला अनोखा निषेध; आगळ्या वेगळ्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात हेमंत ढमढेरे यांनी स्वतःच्या अंगावर शाही फेकून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

Pune News : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहे. मात्र, पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात हेमंत ढमढेरे यांनी स्वतःच्या अंगावर शाही फेकून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. ढमढेरे यांच्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे. (Latest Marathi News)

महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक विधाने केल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका युवकाने शाई फेक केली. त्यामुळे अकरा पोलीस अधिकारी कर्मचारी निलंबित झाले. तर एका पत्रकाराला व्हिडिओ काढल्या प्रकरणी ताब्यात घेतले.

महापुरुषांच्या विरोधात बोलता आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करता हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे सांगत महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर शाई फेकून सत्ताधारी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन केले.

थोर महामानवांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून शाईफेक केली तर पोलीस कारवाई करतात. त्यामुळे मी स्वतःच्याच अंगावर शाई ओतून या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध करीत असल्याचे हेमंत ढमढेरे यांनी सांगितले.

यावेळी महाजननीत संघटनेचे सहसचिव अशोक राऊत, संजय मेहता उपस्थित होते. राज्यभर चंद्रकांत पाटील समर्थक त्यांच्या बाजूने आंदोलन करत आहेत. तर महापुरुषांचा अवमान केला म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहेत. मात्र, हेमंत ढमढेरे यांनी स्वतःच्याच अंगावर चेहऱ्यावर शाई ओतून या घटनेचा निषेध केला हा प्रकार पुण्यामध्ये चांगलाच रंगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 24K, 22K आणि 18K चे ताजे दर

Maharashtra News Live Update: ठाण्यातील ब्रम्हांड परिसरात सदनिकेचा काही भाग कोसळला

स्वातंत्र्यदिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याच्या रंगातील 5 रेसिपी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील

Pune : पुण्यात भोंदू बाबाचं किळसवाण कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; मांडीवर बसवलं अन्...

Sri Lanka cricket: श्रीलंकेत क्रिकेट कोचच्या हत्येने खळबळ; खेळाडूंसोबत भांडणानंतर नेमकं काय घडलं? क्रिकेटपटू अटकेत

SCROLL FOR NEXT