Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

सोमय्या बोलले की २-३ दिवसांत कारवाया होतातच : जयंत पाटील

'सरकारवर याचा परिणाम होणार नाही, सरकार आणि सरकारशी संबंधीत लोकांना बदनाम करण्यासाठी या यंत्रणेचा वापर होतोय'

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांच्या अलिबाग आणि दादर येथील संपत्तीवर ईडीने कारवाई केली आहे मात्र ही कारवाई करण्याआधी त्यांना कसलीही कल्पना देण्यात आली नव्हती. ती दिली पाहिजे होती. कल्पणा देऊन आक्षेप असलेली प्रॉपर्टी वर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, ही सर्व कारवाई संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसत असल्याचं वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.

तसंच ईडीने (ED) त्यांनी काय पुरावे दिले मला ठाऊक नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील ईडीच्या करवाईवर आपलं मतं दोन दिवसापूर्वी व्यक्त केली आहेत. देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी मत व्यक्त केलं असेल तर हे जग जाहीर आहे या एजन्सीचा दुरुपयोग व्हायला लागला आहे.

मात्र, सरकारवर याचा परिणाम होणार नाही, सरकार आणि सरकारशी संबंधीत लोकांना बदनाम करण्यासाठी या यंत्रणेचा वापर होत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

किरीट सोमय्या बोलतात त्या नंतर 2-3 दिवसात त्या घटना घडतात, त्यामुळे ऍक्युरेट अंदाज वर्तवणारे गृहस्थ म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे आणि या एजन्सी कोणत्याही काम आधी त्यांना कल्पना देतात. त्यांना कल्पना देऊनच या कारवाया होतात असा आभास तयार झाला असल्याचंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का; बड्या नेत्यानं सोडली कमळाची साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Ashtavinayak Yatra: अष्टविनायक यात्रा करायची आहे? तर फक्त 3 दिवसांत पूर्ण होईल इच्छा, वाचा संपूर्ण प्लान

Crime News: बायको माहेरी गेली, संतापलेल्या नवऱ्याने मुलाचा घेतला जीव, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Maharashtra Politics : जालन्यात महायुतीत फूट? अर्जुन खोतकर यांचं नाव वगळल्याने शिवसैनिकांचा संताप

SCROLL FOR NEXT