Pune Hotels  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Hotels News : पुण्यात 'रात्रीस खेळ चाले'!, तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर मोठी कारवाई

Pune Hotels News : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता बदलतंय. पुणे सध्या शिक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठीच चर्चेत आहे. गुन्हेगारीचं प्रमाणही पुण्यात वाढत आहे. अशात आता पुणे शहरात रात्री १.३० वाजेनंतर देखील 'आफ्टर पार्टीज्' सुरु असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. (Pune Latest News)

हॉटेल आणि पब्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील 10 हॉटेल्स आणि पबवर ही कारवाई करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणत्या हॉटेल्सवर कारवाई?

  • प्लंज, कोरेगाव पार्क

  • लोकल गॅस्ट्रो बार

  • एलरो

  • युनिकॉर्न

  • आर्यन बार, बालेवाडी

  • नारंग वेंचर

  • हॉटेल मेट्रो

  • लेमन ग्रास, विमाननगर

  • बॉलर

  • हॉटेल काकाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

SCROLL FOR NEXT