गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस बदलापूरातून अटक! Saam Tv
मुंबई/पुणे

गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस बदलापूरातून अटक!

9 ते 10 हजार गुंतवणुकदारांची अंदाजे 22 ते 23 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक

प्रदीप भणगे

डोंबिवली : कमी कालावधीत परतावा देण्याचे अमिष दाखवून 9 ते 10 हजार गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठगास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. आदित्य हेमंत रेडीज (26) असे या ठगाचे नाव असून कल्याण (Kalyan) कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता 1 दिवसापर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी परिसरात असलेल्या ओम प्रथमेश सोसायटीत आरोपी आदित्य रेडीज हा राहतो.

हे देखील पहा :

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा भागातल्या अमृतपार्क सोसयटीत राहणाऱ्या रेखा प्रभाकर झोपे (57) या महिलेने 30 नोव्हेंबर 2020 रोजी डोंबिवलीच्या (Dombivli) विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी (Police) या संदर्भात भादंवि कलम 420, 406, 409, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल केला. नंतर हा गुन्हा ठाण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाचे वपोनि प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर शेख आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

आरोपी आदित्य रेडीज याने याच गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेल्या अरूण गांधी व सद्या भूमिगत असलेल्या अन्य साथीदारांसह संगणमत करुन संपर्क अॅग्रो मल्टी स्टेट को-ऑप सोसायटी लिमिटेड (आधीचे नाव कालीकाई ॲग्रो मल्टी स्टेट सोसायटी) कंपनी सुरू केली होती. यातील तक्रारदार रेखा झोपे व अन्य गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठेवींपोटी रक्कमा उकळल्या. या कंपन्यांत तक्रारदार रेखा झोपे व अन्य गुंतवणूकदारांनी मिळून 35 लाख 38 हजार 350 रुपयांची गुंतवणूका केल्या.

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत केलेल्या तपासात सदर कंपन्यांनी जवळपास 9 ते 10 हजार गुंतवणुकदारांची अंदाजे 22 ते 23 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील मुख्य आरोपी आदित्य रेडीज याच्यासह त्याचे वडील हेमंत रेडीज व आई मानसी रेडीज हे तिघेही गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता झाले. मात्र, मिळताच वपोनि प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर शेख आणि त्यांच्या पथकाने बदलापूर (Badlapur) परिसरात सापळा लावून आदित्य रेडीज याला अटक केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेणमधील 35 हजार गणेशमूर्ती परदेशी रवाना

Salman Khan : सलमान खानचं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक Inactive का झालं? चाहते गोंधळात

Lata Pharande : महिला सरपंचाने केला मोठा घोटाळा, प्रशासनाकडून मोठी कारवाई, साताऱ्यात राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक हरपली; बाजारभावात मोठी पडझड, जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? ₹१५०० बंद का झाले? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT