बलात्कार प्रकरणी फरार आरोपीला हनी ट्रॅप लावून केलं गजाआड चेतन इंगळे
मुंबई/पुणे

बलात्कार प्रकरणी फरार आरोपीला हनी ट्रॅप लावून केलं गजाआड

महिन्याभरापासून फरार असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला तुळींज पोलिसांनी हनी ट्रॅप लावून ठाण्यातून केली आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार: तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीती एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार करणाऱ्या सुरज सारसद (24 )नामक या आरोपीच्या ठाणे आनंद नगर इथून मुसक्या अवल्या आहेत. पोलिसांच्या बनवलेल्या हनीट्रॅपच्या जाळ्यात या आरोपीला बड्या शिताफीने अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

वारंवार बदलत जाणाऱ्या मोबाईल टॉवर लोकेशनमुळे या आरोपीला अटक करण्याकरिता पोलीसांना रेल्वे पासून ते रिक्षा आणि बसचा प्रवास करावा लागला आहे. एका महिन्यापूर्वी घटना घडवून आरोपी सूरज सारसद हा ठाण्याच्या आनंद नगर परिसरात राहत होता. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मल्हार थोरात व या गुन्ह्याचे तपास अधिकारी यांना सूरज ठाण्यात असल्याची चाहूल लागताच आरोपी सूरजला गजाआड करण्याकरिता मोबाईल टॉवर लोकेशन काढून हनीट्रॅपच्या पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या एका नवीन घटना घडवण्याकरिता वाट पाहत बसलेल्या सूरज सारसद याला अटक केली आहे.

सदर घटनेमध्ये आरोपीला लवकरात लकवर पकडावा याकरिता तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष राजेंद्र कांबळे यांच्या आदेशावरून या गुन्ह्याचे तपास आधीकरी पोलीस उप निरीक्षक मल्हार थोरात, पोलीस नायक जावेद तडवी आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस नायक राजाराम काळे यांनी शिताफीने अटक केली आहे. अटक आरोपी सुरज सारसद याला वसई न्यालायत हजर करण्यात येणार असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

Mumbai Building Fire : मुंबईत ७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग

दारूसाठी पैसे दिले नाही; मुलगा आईवर भडकला, रागात हादरवणारं कृत्य केलं

Mirchi Vada Recipe : गरमागरम चहासोबत घ्या कुरकुरीत मिरची वड्याचा आस्वाद, फक्त ५ मिनिटांत रेसिपी तयार

Makeup Tips: पार्टी किंवा फंक्शनसाठी मेकअप घरच्या घरी कसा करावा? वाचा या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT