Mumbai Ahmedabad Accident saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Ahmedabad Highway : मॉर्निंग वॉक करणाऱ्याला ट्रकने उडवले, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Accident News : मुंबई अहमदाबाद महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या रविंद्र पाटील यांना भरधाव ट्रकने धडक दिली. या धडकेत पाटील गंभीर जखमी असून ट्रक चालक अद्याप फरार आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Alisha Khedekar

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या व्यक्तीला भराधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारच्या हद्दीत भालोली या परिसरात रविवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ५४ वर्षीय रविंद्र पाटील गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दी मधील भालोली गावचे रहिवाशी रविंद्र पाटील रविवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास रस्त्याच्या कडेने मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. मात्र मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. आणि घटनास्थळावरुन ट्र्क चालक फरार झाला.

या अपघातात पाटील गंभीर जखमी झाले असून गावातील नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर भाईंदरच्या ओकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या पाटील यांची प्रकृती स्थिर असून ही अपघाताची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याबाबत विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस याची चौकशी करत आहेत. दरम्यान ट्र्क चालकांचा मनमानी कारभार कधी संपणार? यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

Face Care: या सोप्या स्किनकेअर टिप्स फॉलो करुन व्हा फेस्टिव्हलसाठी तयार, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग आणि सोफ्ट

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

SCROLL FOR NEXT