Rishikesh Car Accident  saam tv
मुंबई/पुणे

Car Accident : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली अन्...परतलीच नाही; वाटेतच काळाची झडप

साम टिव्ही ब्युरो

Worli Sea Face : रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वरळी सीफेसवर सकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडून १२० च्या स्पिडने कार चालवत होता. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेटल महिलेच्या अंगावर गेली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. (Morning Walk)

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी डेरी परिसरात महिला मॉर्निंग वॉकसाठी आली होती. राजलक्ष्मी असं या महिलेच नाव आहे. सकाळच्या सुमारास वाहन चालकाने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने कार चालवल्याने हा अपघात झाला. यामध्ये कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. समोरून कारचा चक्काचूर झाला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास त्या व्यक्तींवर कारवाई केली जाते. मात्र अशा घटनेत वाहन चालकाच्या चुकीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मुंबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात

शनिवारी रात्री देखील अपघाताची एक मोठी दुर्घटना घडली. मुंबई येथून बेंगलोरला निघालेली शर्मा ट्रॅव्हलची खासगी प्रवासी बस बावधन जवळ पुलाचे कठडे तोडून सर्व्हिस रस्त्यावर खाली कोसळली. यामध्ये एक गरोदर महिला व तीचे एक लहान बाळ जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रूग्णालयात दाखल केल्याचे समजले आहे. चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं प्रवाशी म्हणत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT