Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: लग्नाचं वचन देत तरुणीवर अत्याचार...; पुण्यातील संतापजनक घटना

त्याने लग्नाला नकार दिलाय. तसेच तरुणीकडून १ लाख रुपये घेऊन फरार झाला.

साम टिव्ही ब्युरो

Pune News: लग्नाचं स्वप्न प्रत्येकच मुलगी पाहत असते. असंच स्वप्न पुण्यातील एका तरुणीने देखील पाहिलं. मात्र स्वप्न पूर्ण होण्याआधीच तरुणीला मोठा धक्का बसला. ज्या मुलाने आयुष्यभराची साथ देण्याचं वचन दिलं त्यानेच तरुणीचा घात केला. लग्नाचे वचन देत तरुणीकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Latets Marathi News)

लग्नाचं वचन अन् पौशांची लूट

पुण्यातील वडगाव शेरी येथील एका २३ वर्षीय तरुणीसोबत ही घटना घडली आहे. एका तरुणाने पीडितेला लग्नाचे वचन दिले. लग्न (Marriage) करण्यासाठी सर्व तयारी झाली. आपल्या आयुष्याच्या जोडीदारावर तिनं विश्वास ठेवला. त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र आता नराधमाने आपला शब्द फिरवला आहे. त्याने लग्नाला नकार दिलाय. तसेच तरुणीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे.

लग्न करण्यासाठी पैशांची गरज असल्याचं सांगत तरुणाने पीडितेकडून पैसे उकळले. ती त्याची वाट पाहत राहिली मात्र तो आलाच नाही. तरुण पैसे घेऊन आपल्या गावी गेला आणि त्याने तिथेच दुसऱ्या एका तरुणीसोबत साखरपुडा उरकून घेतला. तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शुभम पायगुडे याच्यासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शुभमने फिर्यादी तरुणीला लग्नाचे वचन दिले होते. कात्रज येथील एका हॉटेलमध्ये तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले शिवाय लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्याकडून एक लाख रुपये उकळले. शुभमच्या भावाने त्या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत घरी सांगितले असता शुभमच्या कुटुंबीयांनी फिर्यादी तरुणीला शिवीगाळ केली. शिवाय शुभमचा दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा केला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी तरुणी गेल्यानंतर तिला धमकवण्यात आले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT