CJP Instagram Page Shut Down Again; Abhijeet Dipke Reacts AI Image
मुंबई/पुणे

Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सस्पेंड, अभिजित दीपकेंनी पोस्ट करत केला संताप व्यक्त

Abhijeet Dipke CJP Instagram Suspend : CJP चे अधिकृत Instagram पेज पुन्हा बंद झाल्याचा अभिजीत दीपके यांचा दावा. स्वातंत्र्यदिनी पोस्ट करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

Alisha Khedekar

  • CJP चे अधिकृत Instagram पेज पुन्हा बंद करण्यात आले

  • Instagram पेजचा स्क्रीनशॉट शेअर करत दीपके यांनी संबंधितांवर टीका केली

  • दीपके यांचं आजपासून नवीन अभियान सुरु

  • ग्रामीण सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांचा आढावा घेणे हा अभियानाचा प्रमुख भाग

कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP चे ऑफिशिअल इंस्टाग्राम पेज पुन्हा बंद करण्यात आले आहे. याची माहिती पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्वातंत्र्यदिनी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत याबाबत नाराजी व्यक्त केली. पेज हटवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी संबंधितांवर जोरदार टीका केली.

अभिजीत दीपके यांनी Instagram पेजचा स्क्रीनशॉट शेअर करत, त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चा ऑफिशियल Instagram हँडल बंद झाल्याचे म्हटले आहे. पुढे त्यांनी सरकारला 'डरपोक' म्हणून टीका केली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर CJP च्या सोशल मीडिया पेजबाबत चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

आज ८० वा स्वातंत्र्यदिन असून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना अभिजीत दीपके यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा आहे. या फोटोसोबत त्यांनी, “स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा. हा फोटो आपल्यासाठी एक आठवण आहे की, आपल्याला अजूनही खूप मोठा प्रवास करायचा आहे,” असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी पुन्हा लक्ष वेधले.

दरम्यान जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आज पुन्हा अभिजित दिपके ‘स्कूल ठीक करो’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनादरम्यान ते राज्यातील वेगवेगळ्या शाळेत जाऊन तपासणी करणार आहेत आणि त्याचा आढावा घेणार आहेत.ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये बेंच, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शाळांच्या स्थितीबाबत स्थानिक पातळीवर जबाबदारी निश्चित करण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे दीपके यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT