Abdul Sattar Saam Tv
मुंबई/पुणे

Abdul Sattar: राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर सत्तारांचं घुमजाव; मी ते फक्त खोक्यांबाबत बोललो; मी महिलांचा आदर करणारा...

Abdul Sattar Controversial Statement: जे आमच्यावर टीका करतील ते, महिला असो की पुरुष असो त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं सत्तार म्हणाले आहेत.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Abdul Sattar Todays News: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान केलेले आहे. यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सत्तारांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. मुंबईत सत्तारांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी ठाण मांडल्यानंतर सत्तार हे बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दाबाबत खेद व्यक्त केला आहे. मी महिलांचा आदर करणारा असून ते वक्तव्य मी फक्त खोक्यांबाबत केलं होतं, तरी कुणाचं मन दुखावलं असेल तर मी खेद व्यक्त करतो असं सत्तार म्हणाले आहेत. (abdul sattar controversial statement News)

मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, औरंगाबादमध्ये बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कोणत्याही महिला भगिणींबाबत अपशब्द वापरला नाही. जे लोक आम्हाला बदनाम करतायत त्यांच्याबद्दल मी बोललोय. सुप्रिया सुळेंबाबत कोणताही शब्द बोललो नाही, पण तरिही त्यांच्या महिलालांची मनं दुखवली असेल तर मी खेद व्यक्त करतो, पण मी असं बोललो नाही. मी जे बोललो ते फक्त खोक्यांबाबत बोललो ज्याच्या डोक्यात परिणाम आहे. पण जे वेगळा अर्थ काढू लागले. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महिलांचा सन्मान करतायत, तसा मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे असं सत्तार म्हणाले.

याबाबत पत्रकारांनी आणखी प्रश्न विचारले असता सत्तार म्हणाले की, तुम्ही मला उचकवण्याचं काम करु नका, तुम्ही आमच्यात भांडणं लावू नका. आगीत तेल टाकण्याचं काम करु नका. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी महिलांचा आदर कारणारा कार्यकर्ता आहे.

मी अल्टिमेटमला घाबरत नाही

राष्ट्रवादीने दिलेल्या २४ तासांच्या अल्टिमेटमबाबत सत्तार म्हणाले की, कुणीही अल्टिमेटम वैगेरे देऊ नका मी अल्टिमेटमला घाबरत नाही. मी महिलांबत काहीह बोललो नाही. कुणीही माझ्या घराच्या काचा वैगेरे फोडू नका, मी कुणालाही घाबरत नाही असं सत्तार म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT